Sindhudurg Project News :
Sindhudurg Project News : Sarkarnama

Sindhudurg Project News : 'पाणबुडी प्रकल्प' गुजरातला गेला नाही ; मुख्यमंत्री शिंदेंनी केला दावा!

Sindhudurg Project News : पाणबुडी महाराष्ट्राचा प्रकल्प, तो आपल्याकडेच राहणार..
Published on

Mumbai News : महाराष्ट्रातील आजवर अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. यावरुन महाराष्ट्रातील राजकारणात अनेकदा घमासानही घडून आले आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ घातलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची चर्चा होत आहे. 2018 मध्ये देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्गमधून घोषणा करण्यात आली होती. हा प्रकल्प महाराष्ट्राकडून गुजरातने पळाल्याची बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, मात्र या केवळ अफवा असून, हा प्रकल्प महाराष्ट्राचा आहे आणि तो आपल्याच राज्यात राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

Sindhudurg Project News :
‘वेदांत-फॉक्सकाँन’ प्रकल्प : नेमकं खरं अन् खोटं कोण बोलतयं; फॅक्ट चेक !

देशातला पहिला पाणबुडी प्रकल्प गुजरातने पळवला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "तुम्ही खोट्या आरोपांवर विश्वास ठेवू नका. राज्याचे मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत यांच्याशी मी बोललो आहे. पाणबुडीचा जो प्रकल्प आहे, तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे. तो राज्यातून बाहेर जाणार नाही.याची आपण खात्री बाळगा," असे मुख्यमंत्री यांना दावा केला आहे.

काय आहे प्रकरण ?

देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजित होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्यावर यावर एकच खळबळ माजली. यामुळे सराकरवर टीका करण्यात येत होती. मागील दहा पंधरा वर्षांत सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचे गाजर सिंधुदुर्गवासीयांना दाखविण्यात आले. परंतु दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही.

Sindhudurg Project News :
Sindhudurg Politics : मोठी बातमी! महाराष्ट्राला आणखी एक धक्का; 56 कोटींचा पाणबुडी प्रकल्प गेला गुजरातमध्ये?

2018 मध्ये देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्गमधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने पळल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असा आरोप विरोधपक्षनेते अंबादास दानवे यांनीीह केला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com