Pune BJP Leaders Posters: भाजप नेत्यांना पोस्टरबाजी महागात पडली; महापालिकेने दंडाची नोटीसच धाडली...

Pune Politics: दोन दिवसांपुर्वी बालगंधर्व रंगमंदिरात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली.
Pune BJP Leaders Posters
Pune BJP Leaders PostersSarkarnama

Pune Politics: भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीसाठी भाजपने बालगंधर्व रंममंदिर, जंगली महाराज रस्ता परिसरात फ्लेक्सबाजी केली होती. या फ्लेक्सबाजी विरोधात आता महापालिका अॅक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. या फ्लेक्सबाजी प्रकरणात भाजप नेत्यांना महापालिकेने नोटीसा पाठवल्या आहेत. तसेच, महापालिकेच्या परवानगीशिवाय हे होर्डिग्ज लावल्या प्रकरणी भाजप नेत्यांकडून आता दंड वसूल करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation to collect fine from BJP leaders in case of posting posters)

Pune BJP Leaders Posters
BJP Leaders Flex in Pune: भाजप नेत्यांना पोस्टरबाजी महागात पडली; महापालिकेने दंडाची नोटीसच धाडली...

दोन-तीन दिवसांपुर्वी बालगंधर्व रंगमंदिरात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी खुद्द भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पण या बैठकीच्या निमित्ताने भाजपच्या स्थानिका नेत्यांनी बालगंधर्व रंममंदिर, जंगली महाराज रस्त्यावर मोठी फ्लेक्सबाजी केली होती. पथदिव्यांच्या खांबांवरही या बैठकीचे फलक लावण्यात आल्याचे आढळून आले होते.

या बैठकीला फलक लावण्यासाठी परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडे (PMC) केला असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. तर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, की फलक लावण्याबाबत परवानगी घेतली आहे की नाही या बाबत क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल. परवानगी घेतली नसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Pune BJP Leaders Posters
Aditya Thackeray News : आता भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत 'या' नेत्याचीही भर; नागपुरात झळकले बॅनर

बैठकीला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यासठी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या स्वागतासाठी भाजप पुणे शहर आणि स्थानिक नेत्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसर, जंगली महाराज रस्त्यावर मोठी फ्लेक्सबाजी केली होती.संपुर्ण रस्त्या या फ्लेक्समुळे भरुन गेला होता. पण या फ्लेक्ससाठी अतिक्रमण विभागाची परवानगी घेण्यात न आल्याचे लक्षात आल्याने आता महापालिका या पोस्टरबाजी प्रकरणी भाजप नेत्यांकडून दंड वसूल करणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com