सभागृहात पेन ड्राईव्ह, भंडाऱ्यातील ‘त्या’ महसूल अधिकाऱ्यावर कारवाई होणार?

भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनी वाळू माफिया आणि महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत सिद्ध करणारी रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह सभागृहात सादर केला.
Parinay Fuke
Parinay FukeSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या ट्रॅपच्या वेळी पळून गेलेल्या वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर आता निश्‍चितपणे कारवाई होणार, असे बोलले जात आहे. कारण भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी वाळू माफिया आणि महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत सिद्ध करणारी रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह सभागृहात सादर केला.

यावेळी आमदार डॉ. फुके (Parinay Fuke) म्हणाले, भंडारा (Bhandara) आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यात होणाऱ्या वाळू तस्करीचे विषय मी सभागृहात मांडले. यावर वाळू तस्करी होतच नाही, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणत आहेत. त्यामुळे मग मी पुरावा म्हणून ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह सभागृहात सादर केला. वाळू तस्करीत महसूल खात्याच्या मंत्र्यांपासून ते खालपर्यंतचे कर्मचारी गुंतलेले आहेत. म्हणून कारवाई होत नाही. सर्व पुरावे असताना दोषी अधिकाऱ्यांवर सभागृह कारवाई करू शकत नसेल, तर आता दुसरा मार्ग अवलंबावा लागेल.

महसूल विभागाला कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे सभापतींनी सांगितले. जीपीएस प्रणालीद्वारे या अवैध वाळू चोरीच्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवता येऊ शकते का, याबाबत शंका आहे. मात्र जर असे घडत असेल तर कडक पाऊल म्हणून सरकारने मोक्का लावावा, अशी सूचना सभापतींनी केली. यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत विचार करू, येवढेच मोघम उत्तर दिले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय वाळू चोरीला आळा बसणार नाही. त्यामुळे सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे तरी कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. फुके यांनी केली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई निश्‍चित केली जाईल, असे बोलले जात आहे.

Parinay Fuke
मतभेद विसरून परिणय फुके हे आमदार वाघमारेंना तुरुंगात भेटले

महसूल अधिकाऱ्यांचे वाळू माफियांसोबत असलेले साटेलोटे आता त्यांच्यावर उलटायला सुरुवात झाली आहे. आरोप असलेल्या संबंधित अधिकाऱ्याने वाळू तस्करी करणाऱ्या 6 गाड्या पकडल्या. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्या होत्या. या घटनेची नोंद असल्याचे पुरावे आमदार फुके यांनी दिले सादर केले आहेत. मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सभागृहाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे वाळू तस्करीत हात ओले करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वाळू माफियांशी असलेले संबंध महसूल अधिकाऱ्यांना संकटात टाकणारे ठरत आहेत. भंडारा जिल्ह्यात झालेले एसीबी ट्रॅप व अनेक महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईतून वेळोवेळी समोर आले आहे. तरीदेखील महसूल अधिकाऱ्यांना त्यातून धडा घेतलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com