सोमय्यांचा अजित पवारांवर पलटवार; आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या

आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातल्या एकाचे ही उत्तर दिले नाही.
सोमय्यांचा अजित पवारांवर पलटवार; आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या
Published on
Updated on

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज महाराष्ट्राच्या १२.५० कोटी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातल्या एकाचे ही उत्तर दिले नाही. अजित पवार यांच्यात ते करण्याची हिंमत नाही. जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sahakari sakhar karkhana) अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला आता पण तेच चालवत आहेत,"असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पुन्हा अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर पलटवार केला आहे.

किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या घोटाळे बाहेर काढताना दिसत आहेत. अजित पवारांवरही त्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारांसंदर्भात आरोप केले होते. त्यावर आज अजित पवारांनी ही कारखाने विक्रीसंबंधीचे पुरावे माध्यमांसमोर सादर केले. मात्र त्यावरही किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत अजित पवारांवर निशाणा साधाला.

सोमय्यांचा अजित पवारांवर पलटवार; आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या
एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला बेमुदत संपाचा इशारा

अजित पवारांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला. आता पण तेच कारखाना चालवत आहेत. याची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत, पण एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. इन्कम टॅक्सने अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यांवर, कंपन्यांवर 10 दिवस धाडी टाकल्या. अजित पवार, पार्थ पवार, अजित पवारांच्या बहिणी, त्यांचे बिझनेस पार्टनर आहेत. 1000 कोटींची बेनामी संपत्तीबाबत अजित पवार एक शब्दही बोलले नाहीत.''

याचबरोबर, जरंडेश्वर कारखाना विकत घेणाऱ्या गुरू कमोडिटी कंपनीला अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल कंपनीने ३२ कोटी रुपये दिले. गेल्या १० वर्षापासून हा कारखाना खासगी कंपनीकडून चालवला जात आहे. अजित पवार, त्यांच्या २ बहिणी आणि सुनेत्रा पवार हे या कंपनीचे मालक आहेत. साखर कारखाने विकण्याबाबत कोणालाही हरकत नाही, पण बेनामी भ्रष्ट पद्धतीने घोटाळा केला याचा तपास होणारच, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com