State Cabinet Meeting : आता माघार नाही...! शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 9 धडाकेबाज निर्णय

Political News : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत 9 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. येत्या काळात आणखी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राज्यातील महायुती सरकारने निर्णयाचा झपाटा लावला आहे. येत्या काळात अनेक लोकोपयोगी निर्णय घेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जोडण्याचा प्रयत्न राज्य सरकरकडून केला जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर अनेक निर्णय घेतले जात आहेत. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 9 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत 9 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. येत्या काळात आणखी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मराठवाड्यात ओला दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही मोठी घोषणा महायुती (Mahayuti) सरकारकडून होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. (State Cabinet Meeting News)

गुरुवारी दुपारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, शेती या विषयी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत विविध विभागांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील जनतेला होणार आहे.

बैठकीत घेतलेले निर्णय पुढीलप्रमाणे :

सार्वजनिक बांधकाम : पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

पशुसंवर्धन विभाग : अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

वस्त्रोद्योग विभाग : शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

कृषी विभाग : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

महिला व बालविकास : अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

कामगार विभाग : औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

पशुसंवर्धन विभाग : थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.

जलसंपदा विभाग : धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार.

विधी व न्याय विभाग : काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय, पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय, हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करणार

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Congress News : राहुल गांधींसमोरच केली खर्गेंनी मोठी घोषणा; 'लाडक्या बहि‍णींना महिन्याला देणार...'

मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा

महिला व बालकल्याण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे 1 कोटी 60 लाख भगिनींना 4 हजार 787 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे आहे. त्यायासोबतच राज्यात 121 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरली आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
BJP News : भाजपचा पाय खोलात; विधानसभेच्या तोंडावर 'नाफेड'ने कांद्याचे दर पाडले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com