MNS Warning to Amit Jani: असले तमाशे ताबडतोब बंद करा..; सीमा हैदरवर चित्रपट बनवणाऱ्या अमित जानीला मनसेचा थेट इशारा

MNS On Seema Haidar Movie: पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरवर उत्तरप्रदेशचे चित्रपट निर्माते अमित जानी यांनी चित्रपट बनवण्याची घोषणा केली
Amey Khopkar Warning to Amit Jani :
Amey Khopkar Warning to Amit Jani :Sarkarnama
Published on
Updated on

Amey Khopkar Warning to Amit Jani: पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरवर उत्तरप्रदेशचे चित्रपट निर्माते अमित जानी यांनी चित्रपट बनवण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच अमित जांनी यांच्या चित्रपटाच्या घोषणेवर थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. 'हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर...' असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.

चित्रपट निर्माते अमित जानींनी सीमा हैदर आणि सचिनच्या ‘लव्हस्टोरी’वर ‘कराची टू नोएडा’ या नावाने चित्रपटाची घोषणा केली होती. या संदर्भात त्यांनी दोघांना चित्रपटाची ऑफरही दिली होती, तेव्हापासून जानींना धमक्या येण्यास सुरूवात झाली. मनसेच्या आधी समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनीही त्यांच्या चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर आता मनसेही आक्रमक झाली आहे.

Amey Khopkar Warning to Amit Jani :
Nagpur RingRoad News: रिंगरोडसाठी नकाशात भौगोलिक स्थानबदल करून फसवल्याचा आरोप, शेतकरी करणार आंदोलन !

अमेय खोपकर यांनी ट्विट करत जानी यांना इशारा दिला आहे. "पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर, राडा तर होणारच..!!" असा इशारा दिला आहे.

मनसेच्या इशाऱ्यावर अमित जानी यांनीही उत्तर दिले आहे. 'तुमच्यात हिंमत असेल तर हल्ला करून दाखवा. कराची ते नोएडा या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी १९ ऑगस्टला मुंबईला जाणार आहे.मनसेच हिंमत असेल तर माझ्यावर हल्ला करून दाखवावा.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com