Truck Drivers Strike : ट्रक चालकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार

School Bus Association Decision : पेट्रोल आणि डिझेल उपलब्धच नसेल तर आम्ही स्कूल बस बाहेर काढणार नाही, असा ठाम निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे.
Truck Drivers Strike
Truck Drivers StrikeSarkarnama

जुई जाधव

Mumbai News : हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रकचालक प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला आहे. काही भागात हा संप सुरू आहे. मात्र, काही भागातून संप मागे घेण्यात आला आहे. परंतु आता या सगळ्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Students Problems will increase due to the strike of truck drivers)

नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्यानंतर शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी आणि पालकांना अडचणी तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. स्कूल बस असोसिएशनच्या निर्णयानुसार जर पेट्रोल आणि डिझेल उपलब्धच नसेल तर आम्ही स्कूल बस बाहेर काढणार नाही. जितकं पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध असेल, तितकंच आम्ही भरू, असा ठाम निर्णय त्यांनी घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Truck Drivers Strike
Bharat Gogawle: मर्द असतील तर चमत्कार दाखवा; गोगावलेचं राऊतांना खुलं आव्हान

राज्य सरकारने लवकरात लवकर शालेय बसेससाठी लागणाऱ्या डिझेलची सोय करून द्यावी किंवा संपावर तोडगा काढावा, अशी मागणी देखील असोसिएशन मार्फत करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसेल तर स्कूल बसेस रस्त्यावर येणार नाहीत. याबाबतची माहिती आम्ही शाळांना आणि पालकांना ’व्हॉट्स ॲप’ द्वारे कळविले आहे, असे स्कूल असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.

स्कूल बस असोसिएशनचा हा निर्णय त्यांनी पालक आणि शाळांना कळविला आहे. मात्र, याचा त्रास स्कूल बसने प्रवास करणारे विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागणार आहे. हिट अँड रन केसच्या कायद्यामुळे राज्यात वातावरण पेटलं आहे, त्यामुळे अनेक गोष्टींवर याचा परिणाम होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा संप लवकरात लवकर चर्चेद्वारे सोडविण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Edited By-Vijay Dudhale

Truck Drivers Strike
Bhandara Blast : वरठीच्या सनफ्लॅग कंपनीत स्फोट, तीन कामगार भाजले; नागपुरात उपचार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com