Beed : जे गेले ते बरेच झाले. कभी कभी सैलाब आता है, और सबकुछ बदल देता है; तसाच आताही सैलाब आला आणि आमचा संदीप क्षीरसागर नेता झाला. नाहीतर तो तरी कधी नेता म्हणून पुढे आला असता. चांगल्या चांगल्यांना आपण आजपर्यंत छातीवर घेतले आहे. आले अंगावर घेतले शिंगावर हा शरद पवारांचा नियम आहे. आणि आपण सर्व त्यांचे चेले आहोत.
डरेंगे नाही तर लढेंगे. हा सगळा धनशक्ती विरोधात जनशक्तीचा मेळावा आहे. साहेबांचाच फोटो वापरायचा, आणि साहेबाच्याच नावाने दिशाभूल करायची अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवतानाच स्थानिक आमदार संदीप क्षीरसागरां(Sandeep Kshirsagar) ना शरद पवारांसमोरच मोठा शब्द दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची अजित पवार गटाते नेते आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये सभा होत आहे. या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर तुफानी हल्ला चढविला. य़ा सभेला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार फौजिया खान, आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर हे नेते उपस्थित होते.
साहेब आमचा विठ्ठल, साहेब आमचे दैवत, साहेब आमचे हे साहेब आमचे ते म्हणायचे आणि पोस्टरवर काय लिहिलंय. अशी डबल भूमिका महाराष्ट्रात चालणार नाही. दुधाचं दूध आणि पाण्याचे पाणी आपल्या करावंच लागेल अशा शब्दांत आव्हाडांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. साहेबांनी काय नाही दिले. बाहेर काय अपप्रचार केला जात आहे असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाड यांनी केला.
जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) म्हणाले, आता तुम्ही नाद केला आहे. अऱे संदीप तुझी आजी आज आकाशातून , प्रेमाने आनंदाने बघत असेल. कारण मला तुझ्याकडून बघून ही अपेक्षा नव्हती. पण तो ज्यावेळी खात्रीने सांगायचा की, साहेब, तुम्ही येऊन बघा, काय करतोय ते एकदा येऊन बघा. पण हा भगवानबाबाचा, वंजारीसमाजाचा पोरगा तुला शब्द देतो की, बीडच्या लढाईत तु्झ्या खांदाला खांदा लावून लढेन. बबन गिते, शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहेत. हा बीड जिल्हा आपण पुन्हा हलवून टाकू हा साहेबांना शब्द देतो. साहेबांना डिस्टर्ब करण्यासाठी, त्यांची राष्ट्रीय प्रतिमा मलीन करण्यासाठी केले जात आहे असा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला.
'' मुलगा सोडून गेला तरी...''
मागे तुमच्या सगळे माजी आमदार बसलेत. आणि नातू सगळे तुमच्या पुढे बसलेत. आत्तापर्यंत ती पिढी तुमच्या सोबत लढली आता ही नातवे तुमच्यासाठी लढायला पुढे आली आहेत. मुलगा सोडून गेला तरी नातू कधीच सोडून जात नाही. म्हणून ही सर्व नातवंच तुम्हांला धरून पुढे जाणार आहेत. बीड जिल्ह्याचे संपूर्ण वातावरण शरद पवारमय करणार यात काही शंका नाही. हा बीड जिल्हा भगवानबाबा यांचा जिल्हा आहे. जे समतेचे पुजारी आहे असेही आव्हाड म्हणाले.
'' मुंडेंनी माझ्यावरची केस पाठीमागे घ्यायला लावली...''
बीड दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा आहे. आणि त्यांचे आणि माझे संबंध अतिशय चांगले होते. मी विरोधी पक्षात असताना माझ्यावर केस झाली त्यावेळी माझी पत्नी त्यांना भेटायला गेली, तेव्हा त्यांनी तिला विचारले की जितेंद्र का आला नाही, तर ती म्हणाली त्यांना लाज वाटतेय कारण त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा काढला होता. ते म्हणाले,वेडा आहे तो, राजकारणात असे चालत असते. पण त्याच्यावर खोटी केस पडली आहे, त्याचे आयुष्य मी बरबाद होऊ देणार नाही. त्याला एका मिनिटात घेऊन ये. त्याच्यावरची केस मी मागे घ्यायला लावतो. आणि त्याच गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावरची केस पाठीमागे घ्यायला लावली. असे गोपीनाथ मुंडे होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.