Sharad Pawar News : शरद पवार नवा डाव टाकणार; लोकसभेनंतर आता विधानसभेला महायुतीला पुन्हा घाम फोडणार?

MVA Political News: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवून आठ ठिकाणी विजय मिळवला. आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार पुन्हा सज्ज झाले आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Political News: लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी दौरे सुरू करत कार्यकर्ते, मतदारांना साद घालायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेतेही कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्यामुळे फटका बसला, तशीच वक्तव्ये भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून केली जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत 'मिशन 45'चे उद्दीष्ट बाळगलेल्या महायुतीला महाविकास आघाडीने अस्मान दाखवले. यात प्रमुख भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बजावली. महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवून आठ ठिकाणी विजय मिळवला. आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार पुन्हा सज्ज झाले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते महायुतीला पुन्हा घाम फोडणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. (Sharad Pawar News)

सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला. तेथे एका उमेदवाराला पिपाणी हे चिन्ह मिळाले होते. शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्हा तुतारी आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला, असे सांगितले जात आहे. रविवारी शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. ''तुम्ही निवडून कसे येत नाही, हे मी पाहतो. तुम्हा सर्वांच्या मदतीने आपण येथील निवडणूक जिंकू'', असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

यासाठी त्यांनी वापरलेली भाषा वेगळा संदेश देणारी आहे. निवडून कुणीही आले तर तुम्ही सर्वजण आमदार, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे पवारांच्या पक्षाला सातारा विधानसभा जड जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कार्यकर्ते, मतदारांना दिलेला विश्वास महत्वाचा ठरू शकतो.

'मिशन 45'ची तयारी भाजप आणि महायुतीने निवडणुकीच्या काही वर्षे अगोदर सुरू केली होती. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपने त्यांना महायुतीत घेतले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते, पक्ष संपले असे चित्र निर्माण करण्यात भाजपला मोठ्या प्रमाणात यश आले होते.

Sharad Pawar
Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधींवर कारवाईची पुण्यातून कोणी केली मागणी ?

निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर मात्र महायुतीला घाम फुटला. 2019 मध्ये 41 जागा जिंकणाऱ्या महायुतीच्या पारड्यात केवळ 17 जागा पडल्या. भाजपच्या खासदारांची संख्या एकआकडी झाली. महायुतीतून सर्वाधिक जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी झंझावाती प्रचारदौरे केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांपेक्षा शरद पवार यांच्या सभांमुळे अधिक यश मिळाले. मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता भटकती आत्मा असा त्यांचा उल्लेख केला होता.

भाजपला (Bjp) त्याचाही फटका बसला. पक्षाचे नाव, चिन्ह हिरावले गेलेले असतानाही पवारांनी जिद्द सोडली नाही. ते बारामतीतच अडकून पडावेत, यासाठी भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तेथून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी देण्याचे डावपेच आखले होते. तेही भाजप आणि अजितदादांच्या अंगलट आले. शरद पवार बारामतीत अडकून तर पडलेच नाहीत, उलट शेजारच्या माढा मतदारसंघातून भाजपला मात दिली.

Sharad Pawar
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? राजकीय विश्लेषकांचे नेमके म्हणणे काय

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांताच शरद पवार बाहेर पडले आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जसे यश मिळाले, तसेच यश विधानसभेतही मिळेल का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पक्ष फोडल्याचा राग मतदारांनी महायुतीवर एकदा व्यक्त केला आहे. तो दुसऱ्यांदाही व्यक्त करतीला का, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहता विधानसभेलाही महायुतीला घाम फुटणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाकडून पूर्वीप्रमाणेच टीका सुरू आहे. तिकडे, भाजपचे आमदार नितेश राणे हे ध्रुवीकरण होईल, अशी वक्तव्ये पुन्हा करू लागले आहेत. या बाबी लोकांना आवडल्या नव्हत्या, त्याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता.

शरद पवार यांच्या सातारा दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांच्या पक्षातून पवारांकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढली आहे. काही आमदारही पवारांच्या पक्षात येतील, असे सांगितले जात आहे. नेतृत्व सामुदायिक असेल, असे शरद पवार यांनी साताऱ्यात कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

Sharad Pawar
Jaykumar Gore: बारामतीतून सांगावा आला की सगळे माझ्या विरोधात एकत्र येणार; मीच पुन्हा आमदार होणार!

आमदार तुम्ही सर्वजण असाल, महाविकास आघाडीचे सरकार आले तर तेही कार्यकर्त्यांचे, जनतेचे असेल, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद होणार नाहीत असे नाही, मात्र सर्वच पक्षांनी माघार घेण्याची, महाविकास आघाडीच्या छत्राखाली लढण्याची तयारी दर्शवली आहे.

तिकडे, महायुतीत मात्र एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये केली जात आहेत. अपयशाची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तरुण नेत्यांची फळी कामाला लागली आहे, महायुतीला पुन्हा घाम फोडायला सज्ज झाली आहे.

भाजपमध्ये काही जिल्ह्यांत नवीन-जुन्या कार्यकर्त्यांतील बेबनाव समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची समीक्षा करताना धाराशिवसारख्या जिल्ह्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षातील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. पराभव झाला की अशा बाबी समोर येतच असतात. यातून भाजप आणि महायुती किती लवकर बाहेर पडणार, हे महत्वाचे ठरणार आहे, कारण त्यांच्यासमोर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या तरुण फळीतील नेत्यांचे मोठे आव्हान आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Sharad Pawar
Shivsena UBT News : जिथे लोकसभेचा पराभव, त्याच संभाजीनगरातून ठाकरे विधानसभेचे रणशिंग फुंकणार..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com