Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह वापरताना कोर्टाने काही बंधने घातली आहेत. कोर्टाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून घड्याळाचा वापर केला जात असतानाही मीडियामध्ये चुकीची माहिती पसरवून विनाकारण बदनामी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नावाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जी सुनावणी सुरू आहे. त्याबाबत आव्हाड यांच्याकडून वारंवार चुकीची आणि असत्य माहिती पसरवली जात असल्याचा आरोप तटकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुप्रिम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. हा एक विनंती अर्ज होता. त्यावर सुनावणी देताना कोर्टाने ज्या सूचना केलेल्या आहेत. त्यापूर्वीच्या निकालातच दिलेल्या आहेत. मात्र, आव्हाड जी माहिती सांगत आहे. ती खोटी आणि दिशाभूल करणारी आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोर्टाने केलेल्या सूचनांबाबत गेले दोन तास वृत्तवाहिन्यांवर पाहिले. ज्यांची मनोवृत्ती अत्यंत ढासळली आहे त्यांची वक्तव्ये मी ऐकली, अशा शब्दांत तटकरे यांनी आव्हाड यांचा समाचार घेतला. सुप्रिम कोर्टाच्या निकालात असं म्हणण्यात आलं आहे, असा दावा आव्हाड यांनी केला. त्याचा तटकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. तटकरे म्हणाले, कोर्टाने जो निकाल यापूर्वी दिलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अजित पवार यांच्या नेतृत्वातच राहील, असे म्हटलं होतं. घड्याळाचे चिन्ह वापरण्यापूर्वी एक जाहिरात आम्ही वर्तमानपत्रात दिली होती. जाहिरातीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, असं वाक्य जाहिरातीत टाकण्याचे निर्देश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत.
स्वत:ला तथाकथित शाहू, फुले,आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एक व्यक्तिमत्त्व सातत्याने लोकांची दिशाभूल करत असते. वृत्तवाहिन्यामध्ये चुकीची माहिती प्रसारित करते. 'त्यांच्या ट्विटच्या बाबतीतदेखील आम्ही सुप्रिम कोर्टात माहिती दिली. त्यावर त्यांना कोर्टाकडून योग्य ती समज देण्यात आली', असा दावा तटकरे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्या नेत्यांमधील सुरू असलेला हा वाद पुढील काही दिवस तरी असाच सुरू राहणार असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो न वापरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्व प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि उमेदवारांना कळविण्यात आलं आहे. कोर्टातदेखील यावर मत व्यक्त करण्यात आलं होते. दिवंगत नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरतोय, मात्र काही मंडळी जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपदेखील सुनील तटकरे यांनी केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.