Loksabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांना नाना पटोलेंची खुली ऑफर; किती जागा पाहिजेत सांगा...

Nana Patole वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले असतानाच काँग्रेसचे नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे.
Nana Patole, Prakash Ambedkar
Nana Patole, Prakash Ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Akola News : अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. असे असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर आणखी रस्ते बंद झाले नाहीत. मी पुढाकार घेतो. तुमच्या भूमीत येऊन सांगतो. किती जागा पाहिजे ते सांगा, पण भाजपला पराभूत करण्यासाठी समोर या. अर्ग मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे, असे आवाहन त्यांनी केले.

नाना पटोले म्हणाले, नाना पटोलेला अधिकार नाहीत तुम्ही म्हणता. पण, मी स्वत:च्या बळावर सांगतो की, सोबत या. पक्षश्रेष्ठींशी मी बोलेन. प्रकाश आंबेडकरजी अद्याप वेळ गेलेली नाही. 2014 आणि 2019 या दहा वर्षांच्या कालावधीत मतांचं मोठं विभाजन झालं होतं. फुले-शाहू-आ़बेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचं विभाजन करण्याचे षडयंत्र भाजपने नेहमीच रचलं, असेही पटोले यांनी नमूद केलं.

भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. एका मंत्र्यांच्या तोंडावर शाई फेकल्यावर पोलिसांना निलंबित केलं गेलं. हे लोक असेच करू शकतात. मी खासदार असताना मी मोदींना समोरासमोर विरोध केला. अकोल्याचे भाजप खासदार सध्या व्हेंटिलेटरवर असून हे लोक त्यांचे व्हेंटिलेटर कधी काढणार हे सांगता येत नाही. कदाचित निवडणुकीतच काढतील, असेही नाना पटोले म्हणाले.

Nana Patole, Prakash Ambedkar
Akola Loksabha : काँग्रेसने वंचितला दाखविला आरसा, महाराष्ट्रात भाजप नेते मात्र सुखावले !

माझ्या पोटनिवडणुकीत आंबेडकरांनी उमेदवार दिला. मी भाजप सोडलं तेव्हापासून प्रकाश आंबेडकरांनी माझा राग करणं सुरू केलं आहे. आंबेडकरांनी मुंबईतील संविधान बचाव रॅलीत माझा अपमान केला. आंबेडकर खर्गेंना कधीच भेटले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंबेडकरांनी माझ्या नावाने चुकीचे आरोप केलेत. आंबेडकरांनी माझा अपमान केला. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. माझे सर्वच पक्षात मित्र, देवेंद्र फडणवीसही Devendra Fadanvis माझे मित्र आहेत, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. जातीनिहाय जनगणना या माझ्या आग्रहाचा काँग्रेसच्या गॅरंटीत समावेश आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

R

Nana Patole, Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News : 'वंचित'ला घेऊ नका हलक्यात; 2019 ला 14 जणांना होती लाखापेक्षा अधिक मतं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com