Modi Government : मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट मिळणार ; पगारात होणार इतकी वाढ

7th Pay Commission : महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ होणार
Government Employees
Government Employees Sarkarnama

Central Government Employees 7th Pay Commission : मोदी सरकारने (Modi Government)केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employee) महागाई भत्त्यामध्ये ४ टक्कांनी वाढ करणार आहे.

याबाबतचा निर्णय मोदी सरकारने नुकताच घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बक्कळ वाढ होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना सरकारनं मोठ गिफ्ट दिल्याची चर्चा आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance) 4 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Government Employees
NCP News : राष्ट्रवादीच्या शिबिरात अजित पवारांची अनुपस्थिती ; पत्रिकेतून नाव गायब

मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत होणार आहे.येत्या सहामाहीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढला तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पण याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

Government Employees
Karnataka Election : माफिया अतिकला काँग्रेसचे हे खासदार गुरु मानायचे ; BJP मंत्र्यांचा गौप्यस्फोट ; व्हिडिओ पाहा

अशी होणार वाढ..

जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याला सध्या मूळ वेतन 18,000 रुपये आहे आणि त्याला सध्या 42 टक्के दराने 7560 रुपये महागाई भत्ता मिळतो. जर त्याचा महागाई भत्ता 46 टक्के झाला तर कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 8,280 रुपये होईल. अशाप्रकारे, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारात 720 रुपयांची (वार्षिक 8640 रुपये) वाढ होईल.

Government Employees
Jalgaon Sabha News: ठाकरेंच्या सभेपूर्वीच जळगावचं तापमान वाढलं ; गुलाबरावांनी घेतला राऊतांच्या भाषणाचा धसका; म्हणाले..

आता पुढील महगाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के आहे. जर यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली तर 1 जुलैपासून लागू होणारा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

Government Employees
Arvind More Joins ShivSena: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; उपजिल्हाप्रमुखाचा शिवसेनेत प्रवेश

1 जानेवारीपासून लागू

केंद्र सरकारने मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांच्या वाढीची घोषणा केली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के झाला. ही वाढ सरकारने 1 जानेवारीपासून लागू केली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com