Thackeray Group News: ठाकरे गट-पोलिसांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर झटापट

Maharashtra News : कोगनोळी आणि शिन्नोळी येथे कडक पोलिस बंदोबस्त
Maharashtra News
Maharashtra News Sarkarnama

Kolhapur : कर्नाटकात होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास परवानगी नाकारल्यानंतर सीमावासीय मराठी भाषकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्याच्या निषेधार्थ आज ठाकरे गटाने कर्नाटक प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर धडक मारली. या वेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. सकाळी अकरा वाजल्यापासून शिनोळी या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी बेळगाव वेंगुर्ला मार्ग रोखून धरला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे विजय देवणे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकातील मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सीमा समन्वय मंत्र्यांनी कर्नाटक प्रशासनाची चर्चा करून महामेळाव्याला परवानगी देणे आवश्यक होते. मात्र, सीमा समन्वय मंत्री गायब असल्याची टीका देवणे यांनी केली. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देवणे यांनी करत शिंदे सरकारचा निषेध व्यक्त केला.

Maharashtra News
K Chandrashekhar Rao: काय सांगता ! BRS चार महिन्यांत पुन्हा सत्तेवर येणार ?

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव येथील महामेळाव्यास कर्नाटक शासनाने परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आज बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर शिनोळी येथे रास्ता रोको आंदोलन केले. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल चार तास हा राज्यमहामार्ग रोखून धरला.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक शासनाने परवानगी नाकारली असून, बेळगाव शहर परिसरात जमावबंदी आदेश लागू केलेत. त्याच्या निषेधार्थ आज शिनोळी येथे रास्ता रोको केला. बेळगाव, खानापूर, निपाणी व चंदगड, गडहिंग्लज भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, याचा धसका कर्नाटक सरकारने घेऊन कोगनोळी आणि शिन्नोळी येथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

Maharashtra News
Vasundhara Raje :तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार वसुंधरा राजे पाचव्यांदा झालरापाटण मतदारसंघातून विजयी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com