NCP Hearing News : राष्ट्रवादी कुणाची? सुप्रीम कोर्टाचे अजित पवार अन् शरद पवार गटाला मोठे निर्देश

Sharad Pawar Vs Ajit Pawar : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हाबाबत पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. तोपर्यंत अजित पवार गट काय उत्तर देणार आणि त्यावर शरद पवार गटाचे काय प्रतिक्रिया असणार, याकडे लक्ष आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि निवडणूक आयोगाने पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला दिले. यावर सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

या सुनावणीत कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्हाबाबत दोन आठवड्यात आपले उत्तर द्यावे सादर करावे लागणार आहे. तर या प्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. Supreme Court News

सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचे प्रकरण 52 व्या क्रमांकावर होते. या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत शरद पवार Sharad Pawar गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यांनी अजित पवार गटाकडून दोन-तीन महिन्यांपासून उत्तर सादर केले नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर निर्णय देताना कोर्टाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला सूचना केल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ चिन्हाबाबत अजित पवार Ajit Pawar गटाला दोन आठवड्यात आपले म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अजित पवार गटाच्या उत्तरावर शरद पवार गटाला काही आक्षेप किंवा त्यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी त्यानंतर एका आठवड्यात सादर करावे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Imtiyaaz Jaleel : विशाळगड अतिक्रमण प्रकरणी आता 'एमआयएम' मैदानात; कोल्हापुरात काढणार मोर्चा

दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या नावाला आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला परवानगी दिली होती. त्यानंतर आयोगाने शरद पवार गटास दिलेले पक्ष आणि चिन्ह कायमस्वरुपी बहाल केल्याचाही निर्णय दिला आहे. NCP SP

एकीकडे उच्च न्यायालयात मूळ राष्ट्रवादी आणि मूळ चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना दुसरीकडे शरद पवार गटाला दुसरा पक्ष आणि चिन्हा कायमस्वरुपी मिळाले आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Mohan Hambarde : ‘क्रॉस व्होटिंग’बाबत संशयाची सुई वळताच मोहन हंबर्डेंनी घेतली ‘तो मी नव्हेच’ची भूमिका; म्हणाले, अशोक चव्हाणांचा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com