Why I Killed Gandhi : अमोल कोल्हेंच्या 'नथुराम'ला सर्वोच्च न्यायालयात दिलासा!

मागील काही दिवसांपासून या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
Dr. Amol Kolhe in Why i killed Gandhi Film
Dr. Amol Kolhe in Why i killed Gandhi FilmSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या Why I Killed Gandhi या चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या चित्रपटाविरोधात दाखल करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Why I Killed Gandhi या चित्रपटात कोल्हे यांनी नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. त्यावरून राज्यात मोठे वादंग उठले आहे. या भूमिकेमुळे कोल्हे यांच्यावर टीका होत आहे. त्यातच या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापासून रोखावे, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने प्रदर्शन थांबवण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.

Dr. Amol Kolhe in Why i killed Gandhi Film
भाजपची मोठी खेळी; अखिलेश यांच्याविरोधात थेट केंद्रीय मंत्र्यालाच तिकीट

याचिकाकर्त्यांना संविधानातील कलम 226 नुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. थेट सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी याचिकाकर्त्यांनी आधी उच्च न्यायालयात जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. हा चित्रपट 30 जानेवारी रोजी ओटीटीच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे.

अमोल कोल्हे यांचा आत्मक्लेश

वादानंतर कोल्हे यांनी नथुरामची भूमिका साकारल्याबद्दल पश्चाताप होत असल्याचे समोर आले आहे. त्यातूनच त्यांनी २९ जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. त्या ठिकाणी आत्मक्लेश करीत या चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

Dr. Amol Kolhe in Why i killed Gandhi Film
बावनकुळे यांचे थेट सोनिया गांधींना पत्र; बड्या नेत्याची तक्रार अन् केली मोठी मागणी

'व्हाय आय किल गांधी' चित्रपटात नथुरामची भूमिका केली. पण, ती विचारधारा स्वीकारली, असा त्याचा अर्थ अजिबात नाही, हे स्पष्ट करताना खासदार कोल्हे यांनी सांगितले की, एखादे नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र, या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली आहे, ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईमध्ये तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले, ही महत्त्वाची बाब आहे.

महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही, हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रती आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे खासदार कोल्हे यांनी आळंदीतील गांधी स्मारकाला भेट दिल्यानंतर सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com