
Mumbai Latest News : कथित खिचडी घोटाळाप्रकरणी मागील वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या सूरज चव्हाण यांना मंगळवारी जामीन मंजूर झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय आहेत. त्यामुळे सूरज यांनी तुरुंगातून बाहेर येताच थेट मातोश्री गाठले.
मुंबई हायकोर्टाने आज सूरज चव्हाण यांना एक लाख रुपयांच्या जातमुचल्याकवर जामीन मंजूर केला आहे. त्यांना सुमारे वर्षभरापूर्वी ईडीने अटक केली होती. कोरोना काळातील खिचडी वाटपात घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप ईडीने केला होता. याप्रकरणी आता त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.
सूरज चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका होताच थेट मातोश्री गाठले. याठिकाणी मातोश्रीबाहेरच आदित्य ठाकरेंसह पक्षातील इतर काही नेते, पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. चव्हाण गाडीतून बाहेर उतरल्यानंतर थेट आदित्य ठाकरेंच्या दिशेने गेले आणि तिकडून आदित्यही त्यांच्या भेटीसाठी पुढे आले. वर्षभरानंतर भेटल्यानंतर दोघांनीही कडकडून मिठी मारली. यावेळी दोघेही भावनिक झाले होते.
ठाकरे आणि चव्हाण यांच्या भेटीनंतर सर्वजण मातोश्रीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबीयही होते. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंची अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर होताच ठाकरेंनी एक ट्विट करत चव्हाण यांचा वाघ आणि भाऊ असा उल्लेख केला.
आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही, चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरुन दिलं त्यांच्याच वडीलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करुन निर्लज्जपणे मंत्रीपदं मिळवली, पापाचा अमाप पैसा साठवला. पण दुसऱ्या बाजूला मात्र, एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ... सूरज!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.