Maharashtra Political News : पुणे पोर्श कार अपघातानंतर पोलिस, ससून रुग्णालयासह उत्पादन शुल्क विभागाच्या इज्जतीची लक्तरे वेशीला टांगली आहेत. शहरातील पबमधून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोणाकडून किती रुपयांची वसूली करतात, याची यादीच आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली.
यावर विभागाची बदनामी केल्याने धंगेकर आणि अंधारेंनी तीन दिवसांत माफी मागावी, असा अल्टिमेटम उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी दिला आहे. यावर देसाईंनी राज्यातील तंबाखू, दारू, पब्जवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र तेच सभागृहात तंबाखू चोळत बसतात, असा वर्मी घाव अंधारेंनी घातला आहे.
एका पोर्श कार अपघात Porsche Car Accident प्रकरणाने राज्यातील गृह, एक्साईज, वैद्यकीय या सगळ्याच विभागांना भ्रष्टाचाराने किती पोखरून काढले आहे हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत. विशेषतः शंभूराजे देसाईंकडे एकसाईज खाते दिल्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसह पुणे परिसरात सातत्याने ड्रग्जचे साठे सापडत आहेत.
आता एक्साईज खात्याबद्दल न बोललेलेच बरे.एकसाईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत असते. खरे तर त्यांनी दारू, तंबाखू, गुटखा यावर पायबंदी घातली पाहिजे. मात्र तेच लोक सभागृहात तंबाखू चोळत असतात. आता त्यांच्या वर्मावर बोट ठेवले की अब्रू नुकसानीचा दावा टाकेल... तुमच्यावर केस टाकेल असे म्हणत आवाज बंद करतात, अशी टीकाही अंधारेंनी केली.
लोकशाहीमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधिल असतात, हे शंभूराज देसाईंना Shambhuraj Desai कदाचित ज्ञात नसावे. हुकूमशाहीत वावरल्यासारखे कुणावरही केस ठोकेन म्हणतात. त्यांनी आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्जचे साठे, ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आत्ता पुण्यामध्ये चालू असलेले पब, बार आणि तिथले व्यवहारांनी पूर्ण खात्याची चव्हाट्यावर आलेली अब्रू त्यांनी सांभाळावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यांना वाटत असेल की केस, दावे ठोकण्याची भाषा करून सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकाल, तर पुन्हा एकदा सांगते पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून, एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना, कसल्याही केसेसना, धमक्यांना भीक न घालता लढाई चालू ठेवणार आहे, असे थेट चॅलंजे अंधारेंनी देसाईंना दिले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.