Sushma Andhare News : कल्याणमधील दोन उमेदवारी अर्जांवर सुषमा अंधारेंचे सूचक विधान

Kalyan Lok Sabha News : कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर त्या पाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी व माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama

Mumbai News : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने राज्यातील वातावरण चांगेलच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर त्या पाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी व माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोघांचाही अर्ज वैध झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

ऐनवेळी उमेदवार बदलणार असल्याचे देखील चर्चा कार्यकर्त्यांमधून सुरू आहे. दुसरीकडे याबाबत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सूचक विधान केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो. बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट असेल असे समजायचं कारण नाही. शिवसेनेमध्ये अंतिम शब्द पक्षप्रमुखांचा असतो. या सर्व प्रश्नाची निश्चितपणे तुम्हाला उद्या ही सगळी उत्तरे मिळतील, असे सांगत उमेदवारी अर्जाबाबत सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केले. (Sushma Andhare News)

Sushma Andhare
Jayant Patil: भाजपचं इंजिन बिघडल्यानं त्यांनी मनसेचं इंजिन सोबत घेतलं; आघाडीचे इंजिन सुसाट...

दोन टप्प्यातील निवडणुकीचे विश्लेषण येत आहे त्यानुसार ही निवडणूक त्याच्या हातातून निसटल्याची पूर्ण कल्पना आहे. त्यातून बेताल वक्तव्य येत आहेत. मोदी एकीकडे उद्धवजी मित्र असल्याचे म्हणतात तर मग बर नसताना त्यांना सत्ता पटलावरून खाली उतरवले असते का ? असा सवाल अंधारे यांनी विचारला आहे.

आशिष शेलार यांची मागच्यावेळी जागा हुकली होती. ती जागा त्यांना परत मिळावी. दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्कटदाबी करू नये. इतरांचं काय होतंय त्यापेक्षा आपली मुस्कटदाबी कशी थांबवता येईल, याकडे शेलार आणि लक्ष द्यावे, अशी टीका शेलार यांच्या वक्तव्यावर अंधारे यांनी केली.

कल्याणा लोकसभेसाठी वैशाली दरेकर आणि रमेश जाधव यांनी अर्ज भरले असून काही टेक्निकल प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे अर्ज भरण्यात आले होते. उद्या काय ते चित्र स्पष्ट होईल मी ही तिकडेच असेन त्यावेळी आपण बोलू. पक्षात श्रेष्ठींचा आदेश आल्यानंतर आमच्या पक्षातील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आणि उमेदवार आदेश पाळतात, असेही यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी

राज ठाकरे यांनी शिनीवरी झालेल्या कोकणातील सभेत भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. आमच्या गावाकडे एक म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे, आपण टाळ्या ऐका असा टोला अंधारे यांनी यावेळी लगावला.

पंधरापैकी चार ते पाच जागा येतात का पहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शेरोशायरी करत निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सुषमा अंधारे यांनी बोलताना एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे. आमच्यासाठीच राज्यभर वातावरण चांगले आहे. १५ मधील पाच जागा टिकवता येतात का हे त्यांनी पहावे. शेरोशायरी, कविता ,श्लोक ,अभंग, पोवाडे गवळणी या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांना अंधारे यांनी दिले.

Sushma Andhare
Sushma Andhare News : हे वागणे बरे नव्हे; असे सुषमा अंधारे भाजपला का म्हणाल्या ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com