National Anthem Case : ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ? राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

Mamata Banerjee National Anthem Contempt Case : मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात दाखल केली होती.
National Anthem Case
National Anthem Case Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणारी याचिका ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळाली आहे.

आता ममता बॅनर्जी यांना शिवडी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी याबाबतचा तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने दिले आहेत. 28 एप्रिलपर्यंत हा अहवाल शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात सादर करण्याचे सांगितले आहे.

National Anthem Case
High Court News : छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद ? केंद्र व राज्य शासनाला खंडपीठाची नोटीस..

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळत मुंबई सत्र न्यायालयाने दिलेले निर्देश कायम ठेवले.

National Anthem Case
Pimpri Chinchwad News : प्रशासक राजमुळे पिंपरी-चिंचवडकरांची कोंडी; नागरिकांची थेट आयुक्तांकडे गाऱ्हाणी!

दरम्यान, मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान बॅनर्जी यांनी बसलेल्या स्थितीत राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली होती, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या प्रकरणी भाजप कार्यकर्ते गुप्ता यांनी कफ परेड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com