Police Inspector Transfer: राज्यातील 449 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Police Inspector Transfers News: राज्य सरकारने राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल केले.
Police Inspector Transfer
Police Inspector TransferSarkarnama

Mumbai : राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून राज्य सरकारने राज्यातील तब्बल 449 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांनी बदल्यासाठी विनंती अर्ज केले होते. तर काही पोलीस अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून बदल्यांच्या प्रतिक्षेत होते.

या सर्व पार्श्वभूमीवर आज अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत या बदल्या केल्या. राज्यातील तब्बल 449 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये मुदत पूर्ण झालेल्या 336 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. तसेच बदलीच्या विनंतीनुसार, 113 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Police Inspector Transfer
PMC News : तब्बल २५ वर्षानंतर मिळाली मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई; काय आहे प्रकरण ?

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस विभागाच्यावतीने तब्बल 449 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी गृह विभागाने काढले आहेत.

Police Inspector Transfer
Fadnavis on Thackeray: बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व सोडून दिल्याचं जाहीर करा; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान

पोलीस विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, बदलीच्या आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील, त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, त्याबरोबरच त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा, असंही आदेशात म्हटलं आहे. या बदल्यामध्ये काही जणांना मुदतवाढही देण्यात आली आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com