Govinda
GovindaSarkarnama

Thane Constituency: गोविंदाला महापालिकेतील भ्रष्टाचार सांगा, त्यांना मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ दाखवा; ठाकरे गटाची मागणी

Thane Lok Sabha Election 2024: या निवडणूकीत राष्ट्रहिताचे, देशहिताचे आणि भविष्याची पिढी घडविण्याबरोबर शहरात कोणते मोठे प्रकल्प राबविता येतील याचे खात्री आणि आश्वासन देणारी ही निवडणूक आहे.

Thane Lok Sabha Election 2024: भ्रष्टाचार करून, शिवसेनेची गद्दारी करून ठाणे (Thane) शहराची वाट लावणाऱ्या शिंदे गटाला या निवडणुकीत गोविंदा, गोविंदा (Govinda) करावे लागत आहे. अभिनेता गोविंदाला महापालिकेतील भ्रष्टाचार सांगा, त्यांना मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ दाखवा अशी मागणी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी केली आहे.

ठाण्यात (Thane) शिंदे गटाला विकास सांगण्याचे मुद्देच नसल्याने त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विकास दाखवण्यासारखं नसल्याने सिने अभिनेते गोविंदा यांना प्रचारासाठी बोलवावे लागत आहेत. गोविंदाला (Govinda) फक्त घोडबंदर वस्तीत फिरविण्यात आले. त्याला वागळे इस्टेट, राम नगर, लोकमान्य नगर, किसन नगर, रुपादेवी पाड्यात घेऊन गेले असते तर बरं झाले असते अशी टीका गाढवे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोविंदाची पण मस्करीच केली...

खरं तर लोकसभा (Lok Sabha) ही महत्त्वाची निवडणूक समजली जाते. या निवडणूकीत राष्ट्रहिताचे, देशहिताचे आणि भविष्याची पिढी घडविण्याबरोबर शहरात कोणते मोठे प्रकल्प राबविता येतील याचे खात्री आणि आश्वासन देणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत अभिनेते, कलाकार यांना मिरवून फक्त मनोरंजन न करता ठाणेकरांचे महत्वाचे प्रश्न समजून घेतले तर त्याला अर्थ असल्याचे गाढवे यांनी यावेळी सांगितले.

Govinda
Sanjay Raut: ...तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते, राऊतांचं मोठं वक्तव्य

निवडणुकीच्या प्रचारात गोविंदाला आणून शिंदे गटाने मस्करीच केली असल्याची खोचक टीका गाढवे यांनी केली. तसेच ठाणे महापालिकेतील (Thane Municipal Corporation) शिंदे गटाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपने उचललेला मुद्दे, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ गोविंदाला दाखवा अशी मागणी गाढवे यांनी केली.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com