TET Exam Scam : माझा मुलगा परीक्षेला बसलाच नाही ; "मला मंत्रीपदाची काळजी नाही,"

माझी बदनामी करण्यावर कारवाई करणार आहे. याची चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.
 Abdull Sattar
Abdull SattarSarkarnama
Published on
Updated on

TET Exam Scam : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचलं आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी एजंटला पैसे दिले होते. मात्र त्यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत.

यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा समावेश असल्याचा आरोप होत आहे. सत्तार यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणची चौकशी करण्याची मागणी केली आहे. "या प्रकरणात विरोधकांचं षढयंत्र असण्याचा प्रश्न नाही. "आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहोत, कुणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हावी. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्यातच हे आढळलं आहे, मी मुलांवर आरोप करणार नाही मात्र या प्रकरणाची चौकशी मात्र व्हायलाच हवी," असे दानवे म्हणाले.

 Abdull Sattar
TET Exam Scam : टीईटी गैरव्यवहारात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा सहभाग ?

अब्दुल सत्तार म्हणाले, "माझा मुलांचा या प्रकरणाशी संबध नाही, मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी पैसे देऊन परीक्षेला पात्र झाले असल्याचा आरोप केला आहे. त्यांना यात शंका असेल त्यांनी स्वत:चं कोर्ट उभं करावं,"

"आमच्या परिवाराने कुठलाही फायदा करुन घेतलेला नाही. माझी बदनामी करण्यावर कारवाई करणार आहे. याची चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. माझा मुलगा टीईटी परीक्षेला बसलाच नाही," असे सत्तार म्हणाले.

सध्या राज्यातील सत्तासंघर्षात मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला आहे. अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळू नये, म्हणून त्यांची अशी बदनामी सुरु असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सत्तार म्हणाले, "मी मंत्रीपदाची काळजी करीत नाही,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com