Prajwala Scam:भाजपला झटका ; ठाकरे सरकार करणार विजया रहाटकरांची चैाकशी

ही योजना सर्व विधानसभा मतदारसंघात लागू करण्यात येणार होती, परंतु ती निवडक ९८ मतदारसंघांमध्येच लागू करण्यात आली.
Prajwala Scheme Scam
Prajwala Scheme Scamsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या एका योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून समिती स्थापन करण्यात येणार आहे. या योजनेत निधीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande)यांनी याबाबत अधिवेशनात लक्षवेधी प्रस्ताव मांडला होता. त्यावर राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी ही माहिती विधान परिषदेत दिली.

कांयदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रस्तावावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, "प्रज्वला योजनेंतर्गत (Prajwala Scheme Scam)राज्य सरकारच्या पैशाच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक चौकशी समिती स्थापन करेल. महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनाही या आयोगासमोर हजर राहावे लागणार आहे."

“जे बिले सुपूर्द करण्यात आली ती मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य स्वरूपात नव्हती. ही योजना सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात लागू करण्यात येणार होती, परंतु ती निवडक ९८ मतदारसंघांमध्येच लागू करण्यात आली. या योजनेचा लाभ भाजपलाच मिळावा, अशा पद्धतीने विधानसभा मतदारसंघांची निवड करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेली विधेयके हस्तलिखित असून ती अंतिम नाहीत,'' अशी माहिती कांयदे यांनी दिली.

Prajwala Scheme Scam
हिमंत असेल तर ‘द महाराष्ट्र फाईल्स’बनवा ; मोहित कंबोजांचे थेट बॅालिवुडला आव्हान

काय आहे प्रकरण

महिला बचत गटांच्या सदस्यांना कायदेशीर, सामाजिक आणि आर्थिक माहिती देण्यासाठी तत्कालीन सरकारने २०१९ मध्ये प्रज्वला योजना सुरू केली होती. महाराष्ट्र महिला आयोगाने (Maharashtra Women Commission) ही योजना लागू केली होती. भाजपच्या विजया रहाटकर या २०१४-२०१९ दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. या योजनेत निधीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप आहे. त्यामुळे रहाटकरांना चैाकशी आयोगासमोर हजर रहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com