मुंबई : अंधेरीच्या पोटनिवडणुकीत (Andheri By Election) उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच रंगली आहे.एकीकडे भाजप उमेदवाराने अजून अर्ज दाखल केला नाही, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना यांनाच आपल्या बाजून वळवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचे समजते. (Andheri By Election news update)
ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत नोकरी करतात. त्यांनी निवडणुकीला उभे राहण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा ३ ऑक्टोबर महापालिका आयुक्तांना दिला आहे. मात्र, अजूनही त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नसल्याचे समजते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना ही अडचण निर्माण झाली आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. लटके यांचा राजीनामा मंजूर करावा, यासाठी ठाकरे गटाने न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली
नियम काय सांगतो..
मुंबई महापालिकेच्या 1989 च्या सेवाशर्ती नियमावलीनुसार स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी तीने महिने आधीच नोटीस द्यावी लागते. तर राजीनाम्यासाठी एक महिन्यापूर्वी नोटीस द्यावी लागते. महिन्यापूर्वी नोटीस दिली नाही, तर एक महिन्याचा पगार भरावा लागतो.
ऋतुजा लटके यांनी महिन्यापूर्वी नोटीस दिली नाही. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्या मूळ पगाराची 67 हजार 590 ची रक्कम महापालिकेकडे भरली आहे. विभागातून ना हरकत प्रमाणपत्रही मिळवले आहे. मात्र, तरीही महापालिका आयुक्तांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नसल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवारी दिली आहे. तर भाजप आणि शिंदे यांनी अजून उमेदवाराची घोषणा केलेली नाही,पण भाजपच्या मुर्जी पटेल यांना या मतदारसंघातून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. पटेल यांनी या निवडणुकीसाठी सहा महिन्यापासून तयारी केली आहे.
शिवसेवनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह आणि नाव मिळाल्यावर दोघांकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींचे आभार मानले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.