Rutuja Latake : लटकेंच्या राजीनाम्यावर आज निर्णय ; ठाकरे गट गॅसवर, भाजपची 'वेट अँड वॉच' ची भूमिका

Rutuja Latake : राजीनामा मंजुरीबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे लटके यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Rutuja Latake
Rutuja Latake sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अंधेरी विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या घोषित उमेदवार व पालिकेच्या उपायुक्त कार्यालयात कार्यकारी सहाय्यक लिपिक पदावर कार्यरत ऋतुजा लटके (rutuja latake) यांचा नोकरीचा पहिला राजीनामा फेटाळल्यानंतर आता दुसरा राजीनामा प्रशासनाने नियमांवर बोट ठेवत अद्याप मंजूर न केल्याने त्यांच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. (rutuja latake latest news)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप बृहन्मुंबई महापालिकेने मंजूर केला नाही. बुधवारी याबाबत लटके यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. मात्र, राजीनामा मंजुरीबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे लटके यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ऋतुजा लटके याच्या राजीनामा बाबत आज (गुरुवारी) कोर्टात निर्णय होणार आहे. भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम उद्यावर (शुक्रवारी) गेला आहे. लटकेंबाबत कोर्ट काय निर्णय घेते, याकडे भाजपसह अनेकांचे लक्ष आहे.

Rutuja Latake
Andheri By Election : ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गटाची कोर्टात धाव

कोर्टाने ऋतुजा लटके यांच्या विरोधात निर्णय दिला तर भाजपला ही निवडणूक सोपी जाऊ शकते. भाजपचे कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष यासाठी भाजपची वेट अँड वॉच ची भुमिका आहे.

अर्ज भरण्यापूर्वी नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक असते. मात्र, राजीनामा मंजुरीबाबत काहीही कळवण्यात आले नसल्याने त्यांनी बुधवारी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची भेट घेतली. १४ ऑक्टोबरच्या आत अर्ज मंजूर होईल याबाबत काहीही ठोस उत्तर न मिळाल्याने लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी १४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com