Amol Kirtikar News : गजानन कीर्तीकरांची शिंदे-भाजपला साथ, तरीही पुत्र अमोल कीर्तीकरांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरूच...

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमोल यांच्यामागे तपास यंत्रणांनी फास आवळल्याचे चित्र आहे.
Amol Kirtikar News
Amol Kirtikar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांची प्रकरणं थंड बस्त्यात गेली असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे.

खिचडी घोटाळा प्रकरणात शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. वडील गजानन कीर्तीकर यांना शिंदे गट आणि भाजपची साथ असली तरी ठाकरे गटात असलेल्या अमोल कीर्तीकरांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. अमोल हे ठाकरे गटात असल्याने भाजपने शिंदेंच्या मागून त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

Amol Kirtikar News
Womens Empowerment News : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २४ तासांतच स्थगित; सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुकीची प्रतीक्षा

कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना देण्यात आलेल्या खिचडी वाटपात अमोल यांचा किती सहभाग आहे, याचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमोल यांच्यामागे तपास यंत्रणांनी फास आवळल्याचे चित्र आहे. या प्रकरणात त्यांनी सहा तास चौकशी झाल्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं सोडून दिले आहे. आदित्य ठाकरेंचे दुसरे निकटवर्तीय सूरज चव्हाण हेही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

सह्याद्री रिफ्रेशमेंट’चे राजीव साळुंखे, सुजित पाटकर, फोर्सवन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार व कर्मचारी, सुनील ऊर्फ बाळा कदम, ‘स्नेहा केटरर्स’चे भागीदार, नियोजन विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त, अन्य बीएमसी अधिकारी, काही व्यक्ती या प्रकरणात आरोपी आहेत.

फोर्सवन मल्टी सर्व्हिसेसच्या खात्यातून अमोल कीर्तीकरांच्या खात्यात ५२ लाख, तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्याची माहिती आहे. सल्लागार म्हणून त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे ईओडब्लूचे म्हणणे आहे. या प्रकरणात सुजित पाटकर यांच्या खात्यावरही ४५ लाख रुपये जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. १६ रुपये किंमत असलेले खिचडीचे पाकीट ३३ रुपयांना विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Edited By : Mangesh Mahale

Amol Kirtikar News
India Alliance News : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज INDIAची सभा; रोहित पवार, आव्हाडांच्या निशाण्यावर कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com