Womens Empowerment News : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २४ तासांतच स्थगित; सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुकीची प्रतीक्षा

Eknath Shinde News : मुख्यमंत्री कार्यालयातूनच हा निर्णय रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Womens Empowerment News
Womens Empowerment News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून महिला सशक्तीकरण अभियानाचा शासन निर्णय बुधवारी घेण्यात आला होता; पण चोवीस तासांतच हा निर्णय सरकारने स्थगित केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

निर्णयात काही बदल करायचे होते आणि शुद्धिपत्रक काढायचे होते, पण मुख्यमंत्री आणि बालविकासमंत्री गणेशोत्सवात व्यग्र असल्याने थेट निर्णय रद्द करण्यात आला असल्याची माहिती आहे.

Womens Empowerment News
India Alliance News : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज INDIAची सभा; रोहित पवार, आव्हाडांच्या निशाण्यावर कोण?

अभियानाची अंमलबजावणी कशी करायची, अन्य विभागाशी कसा समन्वय साधायचा याबाबत एकमत न झाल्याने पेच निर्माण झाला आहे. हे अभियान सक्षमपणे राबविण्यासाठी अधिकारी नेमण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याचा शासन निर्णय बुधवारी (ता.२०) काढण्यात आला होता. पण २४ तासांच्या आत हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातूनच हा निर्णय रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Womens Empowerment News
Maharashtra Government : महसूल अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा दणका; बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या ११ अधिकाऱ्यांचे निलंबन

गांधी जयंतीपासून हे अभियान राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवले जाणार आहे. पण सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने महिलांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Womens Empowerment News
Supriya Sule News : महिला आरक्षण अंमलबजावणी कधी? सुप्रिया सुळेंना शंका; म्हणाल्या, हा तर पोस्ट-डेटेड चेक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com