India Alliance News : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज INDIAची सभा; रोहित पवार, आव्हाडांच्या निशाण्यावर कोण?

Maharashtra Politics : कल्याणमधील राजकीय गणिते बदलणार असल्याचे संकेत आहेत.
India Alliance News
India Alliance NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये आज (शुक्रवारी) INDIAची सभा होत आहे. राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट), माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सभेला संबोधित करणार आहेत. या सभेमुळे कल्याणमधील राजकीय गणिते बदलणार असल्याचे संकेत आहेत.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह आम आदमी पार्टीचे पदाधिकारीदेखील या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. ठाणे, कल्याण, डोंबिवली हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे .

India Alliance News
Maharashtra Government : महसूल अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा दणका; बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या ११ अधिकाऱ्यांचे निलंबन

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीमधील राष्ट्रवादीचे बहुतेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे येत्या लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड काय बोलणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रोहित पवार पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीमध्ये येत आहेत. महाविकास आघाडी, इंडिया एलआयन्स यांच्या संदर्भात झालेला अन्याय , शिवसेनेमध्ये झालेला बंड, राष्ट्रवादीमधील जे काही लोक सरकारमध्ये गेले त्या संदर्भात तसेच राज्यभर देशभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत या सभेत रोहित पवार आपलं मत व्यक्त करणार असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

India Alliance News
Supriya Sule News : महिला आरक्षण अंमलबजावणी कधी? सुप्रिया सुळेंना शंका; म्हणाल्या, हा तर पोस्ट-डेटेड चेक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com