मुंबई : शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गोंदियात जाधव यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येऊ शकते. त्यांना अटक होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाचे काही कार्यकर्ते या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. भास्कर जाधव यांना तात्काळ अटक व्हायला हवे, अशी मागणी करण्यात आली.
आपल्या देशाचे माननीय राष्ट्रपती या आदिवासी समूहातून येतात. यामुळेच आदिवासीबहूल गोंदिया जिल्ह्यात आदिवासी भावना तीव्रपणे संतापल्याची तक्रार गोंदिया पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आले आहे.देशाच्या राष्ट्रपतींबद्दल अवमानकारक भाष्य वापरणाऱ्या भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करणात यावा. त्यांना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भारतीय दंड विधान कलम 294, 153, 500 आणि कलम 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. भास्कर जाधवांना त्वरीत अटक करण्यात यावी, गोंदिया पोलिसांत अशी तक्रार जाधवांविरोधात दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना गोंदियाचे जिल्हाप्रमुख विंध शिवहरे यांच्याकडून ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
आता या तक्रारीबाबत पोलीसकडून कशी दखल घेतली जाते हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. भास्कर जाधव यांच्यावर काय कारवाई होणार का? मुख्य म्हणजे त्यांना अटक होऊ शकते का ? हे पाहणं महत्त्वाचे आहे. 10 ऑक्टोबर रोजी ठाणे शहरातील गडकरी रंगायतन सभागृह येथे ठाकरे गटाची महाप्रबोधन सभा झाली.
याच सभेत बोलताना भास्कर जाधव यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आणि राष्ट्रपती पदाचा खिल्ली उडवल्याचा आरोप, त्यांच्यावर करण्यात आले आहे. तसेच या वक्तव्यामुळे आदिवासी समाजाचाही अपमान झाल्याचं, तक्ररीत म्हंटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.