Thane Politics : ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नवीन समीकरण पुढे आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि भाजपचे आमदार किसन कथोरे हे एकत्र आले असून त्यांनी सहकार पॅनलच्या माध्यमातून जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.
या निवडणुकीत सहकार पॅनलचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत , तर २ उमेदवार माजी खासदार कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनल तर्फे निवडून आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये असल्याचे चित्र आहे.
बँकेचे निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला ९ जागा ह्या बिनविरोध निवडून आल्या त्यात ७ जागा या सहकार पॅनलने जिंकल्या होत्या तर २ जागा ह्या परिवर्तन पॅनलने जिंकल्या होत्या. आज मोखाडा सेवा सोसायटीच्या माध्यमातून माजी आमदार सुनील भुसार हे बिनविरोध निवडून आले असल्याने आता सहकार पॅनलच्या ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
गेल्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत २१ पैकी १८ जागा निवडून ठाकुरांनी बँक आपल्या ताब्यात ठेवली होती. आता ही बँक पुन्हा एकदा शिंदे-ठाकूर आणि कथोरे यांच्या सहकार पॅनलकडेच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या नव्या युतीमुळे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकी संदर्भात सहकार पॅनलच्या विजयाच्या आखणीकरीता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , हितेंद्र ठाकूर, आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथे आमदार रविंद्र पाठक, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक भाऊ कुऱ्हाडे, संचालक ज्ञानेश्वर डुंबरे, रंभाजी जगताप, दिनेश कथोरे आणि अॅड. नितीन भोईर यांची बैठक आज संपन्न झाली. उर्वरित ११ जगासाठी मोर्चे बांधणी करण्यावर या बैठकीत विचार विनिमय करण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.