Thane Politics : शिंदेंनी जोशात येऊन आव्हाड यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला... पण, स्वत:च घर सावरायला विसरले!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का दिला. मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.
Eknath Shinde | Thane Politics
Eknath Shinde | Thane PoliticsSarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का दिला. मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यात आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यापासून माजी नगरसेविका मनाली पाटील, मनिषा साळवी, ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील अशा जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

मात्र या पक्षप्रवेशाचा सर्वाधिक धसका खुद शिवसेनेतीलच इच्छुकांनी घेतला आहे. आतापर्यंत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व आयारामांना त्यांचे तिकीट कन्फर्म करूनच पक्षात घेण्यात आले आहे. पण यापूर्वी शिवसेनेचे जे शिलेदार निवडणुकीची तयारी करत होते, त्यांना आगामी संधी मिळेल, अशी आशा होती. पण आता 8 वर्षांपासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत पक्षाचे काम करणाऱ्या मुळच्या शिवसेनेतील शिलेदारांना आपल्याच उमेदवारीवर गदा येण्याची भीती सतावत आहेत.

Eknath Shinde | Thane Politics
Thane Politics : आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा 'सर्जिकल स्ट्राईक' : राष्ट्रवादीला जवळपास रिकामचं केलं!

सध्या शिवसेनेच्या मूळ 67 पैकी 64 माजी नगरसेवकांची कुमक शिवसेनेकडे आहे. पण ही ताकद ठाणे शहरात असून नौपाडा आणि घोडबंदर पट्ट्यात भाजपने आपले पाय घट्ट रोवले आहेत. भाजपच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिंदे यांनी ऑपरेशन कळवा राबवले. दोन टप्प्यात 11 माजी नगरसेवकांना शिवसेनेत घेतले. या सर्वांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे वचन दिले; पण त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याप्रति निष्ठा ठेवून असलेले शिवसैनिक नाराज झाले आहेत.

Eknath Shinde | Thane Politics
Thane Politics : ठाण्यात शिंदेंचाच जलवा... 'भाजपच्या' संपर्कातील 'आव्हाडांचे' नगरसेवक डोळ्यादेखत शिवसेनेकडे वळवले!

2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेने 67 जागा जिंकत महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. पण कळव्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 चे पूर्ण पॅनेल राष्ट्रवादीने जिंकले होते. उर्वरित दोन पॅनेलमध्ये शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून आले. आव्हाडांच्या रणनीतीपुढे कळवा, मुंब्रा शिंदे यांना जिंकता आला नव्हता. यात माजी उपमहापौर राजन साप्ते यांचाही पराभव झाला सामना करावा लागला. पुढे साप्ते यांचे स्विकृत नगरसेवक करून पुनर्वसन झाले. पण इतर उमेदवार मात्र पुढच्या निवडणुकीत पुन्हा संधी मिळेल, या आशेवर होते. पण पक्षप्रवेशांच्या या सोहळ्यामुळे इच्छुकांच्या भवितव्यासमोर अंधार पसरल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com