BJP Vs Shivsena : घोडबंदर रस्त्यावरील खड्ड्यांवरुन भाजप -शिवसेना आमने सामने; थेट आयुक्त, महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Thane-Ghodbunder Road Potholes :महापौरांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन या रस्त्याची दुरुस्ती मीरा-भाईंदर महापालिकेमार्फत करू नये,अशी सूचना केली.
BJP leaders protest over dangerous potholes on Thane's Ghodbunder Road, demanding criminal action against the Mayor and Municipal Commissioner.
BJP leaders protest over dangerous potholes on Thane's Ghodbunder Road, demanding criminal action against the Mayor and Municipal Commissioner.sarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Shivsena News : ठाणे घोडबंदर रस्त्याला मीरा-भाईंदरच्या हदीत पडलेल्या खड्ड्यांवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हे खड्डे मिरा भाईंदर महानगरपालिकेने बुजवू नयेत, असा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतला आहे व तसे पत्र महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्तांना दिले आहे. यावरुन शिवसेना शिंदे गट चांगलाच संतप्त झाला आहे.

महापालिकेने हे खड्डे ४८ तासात बुजवावेत अन्यथा लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या महापौर आणि मनपा आयुक्तांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजू भोइर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील फाऊंटन ते गायमुख या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र हे खड्डे भरण्यसाठी नगरविकास विभागाने निधी द्यावा, असा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतला आहे. महापौर डिंपल मेहता यांनी महापालिकेने हे खड्डे बुजवू नयेत, असे आयुक्ताना पत्र लिहिले आहे. यावरुन शिवसेना चांगलीच संतप्त झाली आहे.

BJP leaders protest over dangerous potholes on Thane's Ghodbunder Road, demanding criminal action against the Mayor and Municipal Commissioner.
Vaishali Darekar Rane : उद्धव ठाकरेंना धक्का; वैशाली दरेकर-राणे यांचा राजीनामा! शिंदेंना दिली होती टक्कर!

रस्त्यांची झालेली चाळण, पडलेले खड्डे यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे हे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरांचे कर्तव्य असते. परंतु महापौरांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन या रस्त्याची दुरुस्ती मीरा-भाईंदर महापालिकेमार्फत करू नये अशी तुघलकी सूचना केली आहे.

नगरविकास विभागाने हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना नागरिकांनी रस्त्यावर आपले प्राण गमवावेत, अशी प्रशासनाची आणि महापौरांची छुपी इच्छा आहे का असा सवाल शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. येत्या ४८ तासांच्या आत फाउंटन ते गायमुख रस्त्यावरील व मिरा-भाईंदर शहरातील सर्व जीवघेणे खड्डे युद्धपातळीवर बुजवावेत. जर ४८ तासांच्या आत हे काम पूर्ण झाले नाही आणि खड्ड्‌यांमुळे एखादी दुर्दैवी दुर्घटना घडली किंवा कोणाचा जीव गेला, तर त्याला संपूर्णपणे महापौर आणि महापालिका आयुक्त जबाबदार असतील.

पोलिसांकडे कारवाईची मागणी

४८ तासांची मुदत संपताच जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या महापौरांवर आणि निष्काळजी महापालिका आयुक्तांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरात आंदोलन उभे केले जाईल. असा इशारा भोईर यांनी पत्राद्वारे दिला आहे.

BJP leaders protest over dangerous potholes on Thane's Ghodbunder Road, demanding criminal action against the Mayor and Municipal Commissioner.
Balasaheb Nahata Arrest : श्रीगोंद्याचे बाळासाहेब नाहाटांना अटक; बिगरजामीनपात्र वॉरंटनंतर कारवाई, 11 जणांची 9.49 कोटींची कथित फसवणूक प्रकरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com