Sanjay Pande News : गायकवाड-निकमांना आव्हान देण्याचा निर्धार केलेल्या संजय पांडेंची ऐनवेळी माघार...

Lok Sabha Election 2024 : स्थानिक लोकांच्या आग्रहासाठी आपण निवडणूक लढवत आहोत, असे त्यांनी सांगितले होते मात्र आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Sanjay Pande News
Sanjay Pande NewsSarkarnama

Mumbai News : उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर भाजपकडून उज्जल निकम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर याच मतदारसंघातून राज्याचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी)संजय पांडे यांची एंट्री झाली होती. पांडे यांनी अपक्ष लढणार असल्याचे सांगितले होते. स्थानिक लोकांच्या आग्रहासाठी आपण निवडणूक लढवत आहोत, असे त्यांनी सांगितले होते मात्र आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. (Lok Sabha Election 2024)

कुठल्याच पक्षाने उमेदवारी न दिल्याने आपण अपक्ष निवडणूक लढत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजसेवेची संधी मिळत असल्याने ही निवडणूक लढत आहे, असे ते म्हणाले होते. तसेच लोकांनी संधी दिली, तर सॅनिटेशन, हॅबिटेशन आणि एज्युकेशन ही आपल्या कामाची त्रिसूत्री राहणार असल्याचे पांडे यांनी निर्धार व्यक्त केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील मतदार हा शिक्षित असल्याने ते राजकीय पक्षाच्या पलिकडे जाऊन विचार करतील कारण निवडणुकीत खर्चासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. सुशिक्षीत उमेदवार हा बदल घडवू शकतो. त्यामुळे आता मतदारांना ठरवायचे आहे की राजकीय पक्ष की सुशिक्षित उमेदवार, असेही ते म्हणीले होते.

Sanjay Pande News
Shivsena Vs BJP: "मंगळसूत्रास हात घातला मोदींनी अन् कारवाईचा बडगा उगारला नड्डांवर," ठाकरे गटाचा हल्लाबोल
Sanjay Pande News
Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

भाजप-काँग्रेसच्या उमेदवारांना शुभेच्छा -

निवडणूक लढवणारच असा निर्धार व्यक्त केलेल्या संजय पांडे यांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. यामुळे आता ते निवडणुकीचा भाग असणार नाहीत. माघार घेतल्यानंतर त्यांनी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com