मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे (Thane Loksabha Election 2024) सगळ्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शिंदेंचे निकटवर्तीय, शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) मैदानात आहेत. म्हस्के यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. म्हस्के यांचा प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा नुकतेच कोपरी-पाचपाखाडी परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
शिवसेना आणि अर्थातच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असलेल्या हा विधानसभा मतदारसंघ असल्याने तेथून आपल्या पक्षाला सर्वाधिक मतदान व्हावे,यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी मतदारांना साद घातली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी लता शिंदे (lata Shinde)याही ठाण्याच्या जागेसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. आज त्यांनी परिसरातील व्यापारी आणि माथाडी कामगाराची भेट घेतली. नरेश म्हस्के यांनी विजयी करण्याचे आवाहन मिसेस मुख्यमंत्री यांनी केले.
कोपरी-पाचपाखाडी हा परिसर दिवंगत ज्येष्ठ शिवसैनिक आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. याच मतदारसंघातीन एकनाथ शिंदे हे निवडून आले आहेत. संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघात कोपरी पाचपाखाडीमधून सर्वाधिक मतदान झाले पाहिजे, असे आवाहनही एकनाथ शिंदे नुकतेच केले आहे. नरेश म्हस्के यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राजन विचारे हे उमेदवार आहेत. ठाकरेसेना शिंदेसेना असा सामना याठिकाणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.