Thane LokSabha News : 'सर्व्हेनुसार चालायला गेलो तर कार्यकर्त्यांची गरज काय?' ; प्रताप सरनाईकांचे वक्तव्य !

Power to change survey report among Shiv Sainiks in Maharashtra :सर्व्हे रिपोर्ट बदलण्याची ताकद महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSarkarnama

Thane News : ठाण्याची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळावी. या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्व्हे रिपोर्ट बदलण्याची ताकद महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या शिवसैनिकांमध्ये आहे. जर सर्व्हेनुसार चालायला गेलो तर कार्यकर्त्यांची गरज काय? असा सवालही सरनाईक यांनी उपस्थित केला.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, आधी महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे. ते पाहावे त्यानंतर महायुतीमध्ये काय होते ते बघा असे उत्तर सरनाईक यांनी दिले. मंगळवारी सकाळीच शिवसेना आमदार विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या शुभदीप या बंगल्यावर दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ काही मिनिटांनीच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. दोघांचीही मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. बाहेर पडल्यावर त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.

प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आपण मीरा भाईंदर येथे रस्त्याची काम होत नव्हती. ती कामे होण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधून काम करण्याचे आदेश दिले आहे. असे सांगितले. शिवाय उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडला सातत्याने आग लागत आहे. त्याचा रहिवाशांना त्रास होतो. तेथील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायला आल्याचेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pratap Sarnaik
Market Committee News : 'मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत एक चौरस फूटही FSI वापरलेला नाही'; संचालकांचा दावा!

ठाणे आणि इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट करत या आठवड्यात उमेदवारांच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करतील असे सांगितले. ठाणे लोकसभा मतदारसंघाला 30 वर्षांचा इतिहास असून, ही परंपरा दिवंगत शिवसेना ठाणे (Thane) जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनीही कायम ठेवली आहे. दिघेंप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील तो अंतिमच राहील. तसेच उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्याप्रमाणेच नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे. या दोन्ही जागा मिळाव्यात, असेही म्हटले आहे. दरम्यान, वैभव नाईक यांनी महायुतीवर टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी महाविकास आघाडीने जे उमेदवार जाहीर केले. त्या जागेवर काँग्रेसचा डोळा आहे. आधी महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे ते पाहावे, त्यानंतर महायुतीमध्ये काय होत ते पाहावे, असे सुनावले.

अजितदादांच्या मनोमिलनाबाबत शिवतारेंचे मौनच !

सासवड येथे होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभेबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितले. सभेची तारीख निश्चित झालेली नाही. तारीख आणि वेळ घेण्यासाठी आलो होतो. या सभेला 45 ते 50 हजार लोक जमतील, असा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मनोमिलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

(Edited By Chaitanya Machale)

R

Pratap Sarnaik
Satara Lok Sabha Constituency : कराड दक्षिण-उत्तरची दिलजमाई! साताऱ्यात काँग्रेसला हत्तीचं बळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com