लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. २५० जागांवर मनसे आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. कोकणात मनसेने विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकणचा दौरा करणार आहेत. त्यानंतर त्यांना अहवाल देण्यात येणार आहे, अशी माहिती अभ्यंकर यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.
कोकणातील रस्त्यांची दुरावस्था आहे. पण यापुढे त्यांना मनसे स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा अभ्यंकर यांनी दिला. लाडकी बहीण सारख्या योजना विधानसभेपूर्वी यशस्वी होणार आहेत का? असा सवाल देखील अविनाश अभ्यंकर यांनी यावेळी सरकारला विचारला.
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे २१५ ते २५० जागा लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यानंतर त्या जागा कोणत्या याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अशातच मनसे रत्नागिरीतील ५ जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज ठाकरे यांचा १ ऑगस्टपासून महाराष्ट्राचा दौरा सुरु होणार आहे. ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.
निवडून येण्याची तयारी आणि कुवत असलेल्याच लोकांना तिकीटं दिली जातील. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा, अशा कुणालाही तिकीट दिलं जाणार नाही, असे राज ठाकरेंनी सांगितले आहे. 'जे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे जी माहिती आहे, ती नीट प्रामाणिकपणे द्या. कारण तुम्ही दिलेली माहितीही तपासली जाणार, असेही राज ठाकरे म्हणाले.
विधानसभेसाठी पुण्यातही हालचाली वाढल्या आहत. वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसर मधून मनसेचा नवा शिलेदार साईनाथ बाबर रिंगणात उतरणार आहेत. हडपसरमधून मैदानात उतरणार असल्याचे खुद्द साईनाथ बाबर यांनी व्हाट्सअप स्टेट्स ठेवत सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.