TMC Budget 2024 : ना करवाढ, ना दरवाढ; ठाणे महापालिकेचे काटकसरीचे बजेट

TMC Commissioner Abhijeet Bangar : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत केवळ 75 वर्षांखालील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा होती. यापुढे 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना ही सुविधा लागू होईल.
TMC Budget, Commissioner Abhijeet Bangar
TMC Budget, Commissioner Abhijeet BangarSarkarnama
Published on
Updated on

Thane Municipal Budget 2024 News :

ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी 2023-24 चे 05 हजार 988 कोटी 9 लाख रुपयांचे सुधारित जमा अंदाजपत्रक आणि 2024-25 चे 5 हजार 25 कोटी 1 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. कोणतीही करवाढ व दरवाढ नसणारा आणि काटकसरीचे हे बजेट आहे. यामध्ये महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर असून, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवकांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर, भांडवली कामाअंतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन तसेच कामाचा दर्जा उत्तम राहावा, याकडे विशेष लक्ष हे बजेटचे उद्दिष्ट आहे.

TMC Budget, Commissioner Abhijeet Bangar
Thane Municipal Corporation : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ऐकावं ते नवलच; महापालिका मुख्यालयातून 'ती' महत्त्वाची नोंदवही गायब

ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) यंदाच्या बजेटमध्ये विविध माध्यमांतून एकूण 3 हजार 281 कोटी 93 लाख रुपयांचे उत्पन्न ग्राह्य धरण्यात आले आहे. यात...

मालमत्ता कर - 819 कोटी 71 लाख

विकास व तत्सम शुल्क - 750 कोटी

स्थानिक संस्था कर - 1 हजार 350 कोटी 42 लाख

पाणीपुरवठा आकार - 225 कोटी

अग्निशमन दल - 100 कोटी 3 लाख

जाहिरात फी - 24 कोटी 62 लाख

स्थावर मालमत्ता भाडे - 12 कोटी 15 लाख रुपये

यांचा समावेश आहे. याच जोडीला ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडून आणि इतर सरकारी विभागांकडून यावर्षी 284 कोटी 32 लाखांचे अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कौसा येथे स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालयात 150 खाटांचे रुग्णालय महापालिकेमार्फत पीपी तत्त्वावर चालवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येथे कर्करोगग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा आणि मोफत उपचार केले जाणार आहेत. जोडीला शहरात मध्यवर्ती ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावाने ग्रंथालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे, तर धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे स्मारक उपवन येथील महापौर निवासस्थानी करण्याचे नियोजन केले आहे. शिवाय नव्याने येणाऱ्या महापौरासाठी नवीन निवासस्थान उभारण्याचे नियोजन या बजेटमध्ये करण्यात आले आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या (TMT) बसमध्ये महिलांना प्रवास भाडे दरात 50 टक्के सूट देण्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी केवळ 75 वर्षांखालील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा होती. यापुढे 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना ही सुविधा लागू होईल. उल्लेखनीय बाब म्हणजे भविष्यातील आधुनिक ठाणे शहर वसवण्यासाठी बजेटमध्ये विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

TMC Budget, Commissioner Abhijeet Bangar
Loksabha Election 2024 : श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आनंद परांजपे? कल्याणमध्ये पडद्यामागून हालचालींची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com