Shivsena Vs BJP : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या नेत्याकडून मारहाण, ऐन निवडणुकीपूर्वी ठाण्यातलं वातावरण तापलं

Shiv Sena BJP Clash Thane : गुरूवारी (ता.20) रात्री बीएसयूपी घरांना शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्याच्या निर्णयाचं स्वागत आणि सेलीब्रेशन करण्यासाठी शिंदेंचे कार्यकर्ते BSUP इमारतीत आले होते. तर पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये असेच सेलिब्रेशन केलं जाणार होतं.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Thane News, 21 Nov : उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या प्रंचड धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे एकमेकांचे पदाधिकारी फोडल्याचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे.

तर आता दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच भाजप आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकाने थेट शिंदेंच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची माहिती मसोर आली आहे.

या राड्यानंतर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडीक, शाखाप्रमुख महेश लहाने आणि उपविभागप्रमुखाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Eknath Shinde News
Maharashtra Government : आमदार-खासदारांचा मानमरातब राखण्यासाठी राज्य शासनाचा नवा जीआर; अधिकाऱ्यांना आता उभं राहून अभिवादन करावं लागणार

नेमकं काय घडलं?

गुरूवारी (ता.20) रात्री बीएसयूपी घरांना शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्याच्या निर्णयाचं स्वागत आणि सेलीब्रेशन करण्यासाठी शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीत आले होते. तर पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये असेच सेलिब्रेशन केलं जाणार होतं.

Eknath Shinde News
Kagal Politics : कागलचं राजकारण 'त्या' 10 खुनापर्यंत गेलं, मुश्रीफांनी मंडलिक-घाटगे गटाचा रक्तरंजित इतिहासच काढला

मात्र भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांन कसे सेलिब्रेशन करता? असे विचारात मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर शिंदेंच्या पदाधिकारी, कार्यकर्कत्यांनी मोठी गर्दी केली होती.

भाजपच्या दादागिरीला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेतील वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com