Thane ZP Recruitment : ठाणे जिल्हा परिषदेत ५२६ प्राथमिक शिक्षकांची भरती; मराठी माध्यमाच्या ४९९ जागा

Thane Zilla Parishad teacher recruitment 2026: पात्र उमेदवारांना ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्ज अथवा पसंतीक्रमावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही.
Thane ZP primary teacher recruitment
Thane ZP primary teacher recruitmentAI
Published on
Updated on

Thane primary teacher vacancy 2026: ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी ५२६ प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पवित्र संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ४९९, तर उर्दू माध्यमाच्या २७ जागांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत आपला पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी उपलब्ध पदांचा तपशील, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, पात्रतेचे निकष आणि आरक्षणाच्या तरतुदी तपासून पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी पसंतीक्रम नोंदविताना वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती अचूक भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे.

११ ऑगस्ट अंतिम मुदत

पात्र उमेदवारांना ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्ज अथवा पसंतीक्रमावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. त्यामुळे अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता विहित कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Thane ZP primary teacher recruitment
Teacher Recruitment 2026: 30 हजार 209 शिक्षक पदांची मेगाभरती सुरू! 19,881 जणांना मुलाखतीशिवाय नोकरी; कुठे किती पदे?

'त्या' मध्यस्थांवर विश्वास ठेऊ नका

अधिकृत संकेतस्थळावरच माहिती भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात, पात्रता, पदांचा तपशील, पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया आणि अद्ययावत सूचना उमेदवारांनी पवित्र संकेतस्थळावरूनच तपासाव्यात. अनधिकृत व्यक्ती, मध्यस्थ किंवा संकेतस्थळांवरील माहितीवर विश्वास ठेवू नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Thane ZP primary teacher recruitment
Teacher Recruitment 2026 : कोल्हापुरात 606 शिक्षक भरती होणार, कोणत्या विषयाला किती शिक्षक सेवेत घेणार? जाणून घ्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com