Mumbai Political News: मुंबई बाजार समिती बरखास्तीच्या हालचाली; भाजप शिवसेनेचे प्रशासक मंडळ येणार

BJP & Shivsena : शिवसेना भाजपाचे आर्थिक सत्ता केंद्र ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू....
Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Devendra Fadnavis | Eknath Shinde|sarkarnama
Published on
Updated on

गणेश कोरे

Mumbai : ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला आहे. यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर यांसारख्या मोठ्या बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.

देशातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या निवडक बाजार समित्यांमधील एक असलेले आणि मुंबईचे मोठे आर्थिक सत्ता केंद्र असलेली मुंबई बाजार समिती ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिवसेना भाजपाकडुन सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक सत्ता केंद्रे ताब्यात घेण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Chandrashekhar Bawankule News : खडसे आमच्यासाठी आजही आदरणीयच आहेत!

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे १० संचालक अपात्र ठरले आहेत. यामुळे १८ पैकी १० संचालक अपात्र झाल्याने आणि संचालक मंडळातील सदस्यांकडे सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष पणन संचालक विनायक कोकरे यांनी काढला आहे.

तसेच आपले संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये अशी नोटीस पणन संचालकांनी बाजार समिती संचालकांना पाठवली आहे. यामुळे आता मुंबई बाजार समिती बरखास्त करून, शिवसेना भाजपाचे प्रशासकीय मंडळ नियुक्तीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Devendra Fadnavis | Eknath Shinde|
PM Narendra Modi News : पंतप्रधान मोदींच्या हस्ते तब्बल ७१ हजार तरुणांना नियुक्तपत्र मिळणार

तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या संचालकांची संख्येमुळे बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू नसल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया पणन संचालनालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे. हा त्याच राजकीय प्रयत्नांचा भाग असल्याची चर्चा आहे.

...तर कारवाईचा इशारा!

विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत पणन संचालकांनी ८ संचालकांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीला १८ एप्रिल पर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या संचालकांनी त्यांचा समाधानकारक खुलासा न केल्यास पणन कायद्यानुसार कारवाईचा इशारा दिला आहे.

शिवसेना- भाजपामध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

बाजार समिती बरखास्त करून त्यावर शिवसेना भाजपाचे प्रशासकीय मंडळ आणुन आर्थिक सत्ता केंद्र ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. यासाठी शिवसेना भाजपामध्ये मोठी रस्सीखेच आणि स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत.

Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Pune Municipal Corporation : टेकड्यांवर अतिक्रमण झाले तर जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची; आता कारवाई होणार का?

पणन मंत्रालयाचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तर बाजार समितीचे कार्यक्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे कल्याण परिसरात असल्याने प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची वर्णी लागण्याची शक्यता असली तरी भाजपाकडे सहकार मंत्रालय असल्याने भाजपादेखील आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागण्यासाठी प्रयत्नशील असल्याने अध्यक्षपद शिवसेना की भाजपाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

....त्यामुळे बाजार समितीचं अधिक्रमण आवश्‍यक

बाजार समितीच्या संबधित घटकांच्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज करण्याकरिता गणपूर्तीअभावी तसेच समिती सदस्यांवर सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास बाजार समिती असमर्थ असल्याने आणि त्यामुळे कायदेशीरदृष्‍ट्या सक्षम नसल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिक्रमण करणे आवश्‍यक झाले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com