Pune Municipal Corporation : टेकड्यांवर अतिक्रमण झाले तर जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची; आता कारवाई होणार का?

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी टेकड्यांवर अतिक्रमणाबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सुनावलं
une Municipal Corporation
une Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत घेत पुण्यातील विविध प्रश्नासंदर्भात संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे शहरातील टेकड्यांवरील अतिक्रमणाबबात भाष्य केलं.

शहरातील टेकड्यांवर अतिक्रमण, खोदकाम सुरू असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी यावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, टेकड्यांची सुरक्षा करणे ही महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. अतिक्रमण होणार असेल तर त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.

une Municipal Corporation
Chandrakant Patil News : नऊ मे पूर्वी निकाल आला तर महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये; अन्यथा...

महापालिकेने अडीचशे कोटी रुपये खर्च करून वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्याचा घाट घातला आहे. याला नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. तर भाजपसह इतर राजकीय पक्षांनीही या प्रकल्पास विरोध केला आहे. यानंतर आज झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.

यावेळी पाटील म्हणाले, ''गेल्या सव्वा वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असल्याने व लोकप्रतिनिधी नसल्याने क्षेत्रीय कार्यालयांच्या कामावर चर्चा झाली नाही. त्यामुळेच ही बैठक घेतली. स्वच्छता, मलःनिसारण, पावसाळी गटारांची स्वच्छता, नाले सफाई यासह इतर विषयांवर चर्चा झाली. टेकड्यांवर अतिक्रमण झाले तर त्याबाबत क्षेत्रीय अधिकारीच जबाबदार असतील'', असा इशाराही त्यांनी दिला.

une Municipal Corporation
Gram Panchayat By Election : जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींचा गुलाल मे महिन्यात उधळणार !

''चार लाख नागरिक रहत असलेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील टेकड्यांवर अतिक्रमण होत असेल तर त्यांना तेवढंही लक्षात नाही का? असा जाब विचारला जाईल. टेकड्या सुरक्षीत राहिल्या पाहिजेत ही जबाबदारी या अधिकाऱ्यांचीच आहे. आमच्या पक्षाचा नेता, आमदार, मंत्री असला तरीही त्याचे अतिक्रमण पाडले पाहिजे. टेकड्यांवर अतिक्रमण झाले तर अधिकाऱ्यांनी मदत मागवून घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत'', असं ते म्हणाले.

une Municipal Corporation
Chandrakant Patil : चंद्रकांतदादा म्हणतात; माझी व्यक्तिगत भूमिका छोट्या महापालिकांच्या बाजूचीच !

बालभारती पौड फाटा प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी नागरिकांचा विरोध आहे. भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही नागरिकांना पाठिंबा देत हा प्रकल्प होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. यावर बोलताना पाटील म्हणाले, ''प्रशासन हे त्यांच्या नियोजनानुसार काम करतं. त्यामुळे पर्यावरणवादी नागरिकांशी संवाद साधणार आहे. लोकशाहीत ‘हम करे सो कायदा’ चालत नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, फ्लेक्स लावले, फटाके फोडले तर मी कार्यक्रमाला येणार नाही असे सांगतो. तरीही कार्यकर्ते फ्लेक्स लावतात. महापालिकेने असे अनधिकृत फ्लेक्स माझा फोटो असला तरी काढून तो टाकावे. तर कार्यकर्त्यांनी अधिकृत ठिकाणीच फ्लेक्स लावावेत, असंही ते म्हणाले.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com