MLA Disqualification Case: नार्वेकरांसमोरच शिंदे-ठाकरे गटाचे वकील भिडले; 20 ऑक्टोबरला होणार महत्त्वाचा निर्णय ?

Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज जवळपास तीन तास दोन्ही गटांकडून युक्तिवाद करण्यात आला.
Eknath Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या वेळी जवळपास तीन तास दोन्ही गटांकडून युक्तिवाद करण्यात आला. आज ठाकरे गटाच्या तीन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. या वेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, याचवेळी दोन्ही गटांत जोरदार खडाजंगी झाली.

या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अजय चौधरी, अनिल परब यांच्यासह त्यांचे वकील देवदत्त कामत उपस्थित होते, तर शिंदे गटाकडून त्यांचे वकील उपस्थित होते. या वेळी सर्व आमदारांच्या याचिकेवर एकत्र सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. मात्र, या मागणीला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला. तसेच शिंदे गटाच्या वकिलांनी सर्व याचिका एकत्र न करण्यावर भूमिका मांडली.

Eknath Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Rajasthan Assembly Election : सत्ता कुणाचीही असो राजस्थानमध्ये 20 वर्षांपासून गेहलोत अन् वसुंधरा राजेंचाच जलवा

प्रत्येक याचिकेची कारणे वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या, अशी मागणी शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना करण्यात आली, पण या मागणीला ठाकरे गटाने विरोध केला. यावर प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असल्यामुळे याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल, असा सवाल विधानसभा अध्यक्षांनी केला.

दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षांसमोरील झालेल्या सुनावणीतील तीन विषयांवरील निर्णय 20 ऑक्टोबरनंतर येण्याची शक्यता असल्याची माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना दिली, तर आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीच्या वेळापत्रकानुसार 12 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या दरम्यान युक्तिवाद होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांत अंतिम सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Eknath Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Anurag Thakur Mumbai Visit: मुंबईसाठी भाजपचा 'मास्टर प्लॅन'; अमित शाहांनंतर अनुराग ठाकूर घेणार मतदारसंघाचा आढावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com