Ahmednagar Violence: संभाजी महाराजांच्या मिरवणुकीत दोन गटात तुफान राडा; अकोला पाठोपाठ अहमदनगरमध्ये हिंसाचार

Ahmednagar News | या दंगलीत चार पोलीस गंभीर जखमी झाले असून वाहनांची आणि दुकांनांचीही तोडफोड करण्यात आली आहे
Ahmednagar Violence:
Ahmednagar Violence:Sarkarnama

Ahmednagar Violence: दोन दिवसापुर्वी अकोला शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. या दंगलीमुळे उसळेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला तर दहाहून अधिक जण जखमी झाले. या दंगलीत वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेला काही तास उलटत नाहीत तर अहमदनगरमध्येही दोन गटात झालेल्या राड्याचे दंगलीत रुपांतर झाल्याची बातमी समोर आली आहे. (Two groups pelted stones in Sambhaji Maharaj's procession)

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (१४ मे) शेवगाव शहरात मिरवणूक निघाली होती.या मिरवणुकीत दोन गटांत वाद झाला या वादानंतर दोन्ही गटात दगडफेक झाली. यात गोंधळात चार पोलीस जखमी झाले तर काही वाहनांचंही नुकसान झालं आहे. (Akola Violence)

Ahmednagar Violence:
Vijay Wadettiwar : पटोलेंनी वडेट्टीवारांना दूर ठेवल्यामुळे गडचिरोलीत सुपडा साफ, चंद्रपुरात आठ बाजार समित्यांवर झेंडा !

मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणूक सुरु असताना दिशेनं एका गटानं दगडफेक केली. तर धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. त्याचं प्रत्युत्तर म्हणून मिरवणुकीवर दगडफेक केली, असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे. या गोंधळामुळे स्थानिक व्यावसायिकांनी काही वेळासाठी गोंधळून गेले होते. पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच त्यांनी दुकाने पटापट बंद केली. (Akola Violence news Update)

दोन्ही गटातील जमावाने वाहनांची तोडफोड केल्याने वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले. दुकानांचीही तोडफोड केली. याचदरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी 102 जणांवर आणि 50 अज्ञात लोकांवरही रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (National politics)

Ahmednagar Violence:
Brij Bhushan Singh: २२ दिवसांनंतर आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंचा संयम सुटला; ब्रिजभूषण सिंहांविरोधात उचललं 'हे' मोठं पाऊल

तसेच, शेवगाव शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्याही दोन तुकड्या सध्या तैनात करण्यात आल्या आहेत.पण हा वाद नेमका का आणि कोणी सुरू केला, हे अद्याप समोर आलेलं नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com