
Mumbai : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील युतीस सरकारमध्ये भाजप, शिवसेना( शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र आल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहे. याचवेळी बैठका, मेळावे, दौरे यांना या आऊटगोईंग, इन्कमिंग यांसह राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देण्यात येत आहे. आता ठाकरेंनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांची तोफ धडाडणार आहे.
ठाकरे गटाकडून येत्या 22 जुलैला ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या ठाण्यात हा मेळावा होणार असल्यानं पुन्हा एकदा ठाकरेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे असण्याची शक्यता नाही.
मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेत बंडखोरी केली होती. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिली आहे. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. यानंतर पुन्हा एकदा उध्दव ठाकरेंनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. याच धर्तीवर त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका, मेळावे घेतानाच राज्यव्यापी दौरा देखील सुरु केला आहे. त्याची दौरा विदर्भ दौऱ्यानं केली आहे.
मुंबईप्रमाणेच राज्यातील इतर प्रमुख महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचवेळी भाजप व शिंदे गटासमोर तगडं आव्हान उभं करतानाच या मुंबईसह ठाण्यातील महापालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे. याच धर्तीवर फेब्रुवारी महिन्यात गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात हा मेळावा होणार आहे.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उत्तर भारतीयांचा मेळावा
आगामी ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टिकोनातून हा ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा महत्त्वाचा असणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मागील आठवड्यात आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात विदर्भातून केली होती. त्यांनी भाजपचा आणि फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये सभा देखील घेतली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात हा मेळावा होणार आहे.
गेल्या २५ वर्षापासून सेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका खेचून आणण्यासाठी भाजपने सध्या जोर लावला आहे. भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. सुमारे 3 कोटी 29 लाख इतकी लोकसंख्या वास्तव्य करतात. मराठी भाषिकांच्या तुलनेत हिंदी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. भाजप(BJP)ने ही मते डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहे. सेनेच्या बालेकिल्ल्यात प्राबल्य वाढवण्याची रणनीती आखली आहे. मुंबई, ठाण्यात सर्वच भाषिक मतदार असल्याने त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत.
आगामी काळात महापालिका निवडणुकीसाठी हिंदी भाषिक मतदारांना वळवण्यासाठी सर्वच पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत हे स्पष्ट आहे.हिंदी भाषिकांची वाढती संख्या, वाढते हिंदी भाषिक नगरसेवक, यातच राजकीय पक्षांच्या वादात होत असलेले मतांचे विभाजन हे आपल्याच पथ्यावर कसे पडेल याचीच चाचपणी उध्दव ठाकरे आणि त्यांचा पक्षामार्फत आता मेळाव्या निमित्त केली गेलीय असे म्हटले तरी राजकीयदृष्ट्या वावगे ठरणार नाही.
ठाकरे गटाचा हिंदी भाषिक मतदारांवर डोळा...
याचवेळी शिवसेनेत फूट पडली असली तरी, भाजपला काटें की टक्कर देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी कंबर कसली आहे. शिवसेनेने आजवर मराठी भाषिकांच्या मुद्दयावर राजकारण केले. मराठी मतदारांनी ही शिवसेना, मनसेला भरभरुन साथ दिली. तर गुजराती, मारवाडी मतदार नेहमीच भाजपला पाठिंबा देत आले आहेत.
उत्तर भारतीय मतदार हे यापूर्वी बसपा आणि काँग्रेसकडे जात होते. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे ते देखील भाजपकडे वळले आहेत. मुंबईत हिंदी भाषिक मतांचा टक्का अधिक आहे. त्या मतांवर आदित्य ठाकरे यांचे लक्ष आहे. ही मते आपल्या वळवण्यासाठी त्यांनी परप्रांतीय नेत्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. मुंबई, ठाण्यात सर्वच भाषिक मतदार असल्याने त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.