Mumbai News : महाविकास आघाडीचं ठरलं...; मात्र आंबेडकरांमुळे अडलं?

Mahavikas Aghadi रामटेक, वर्धा, उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर आणि यवतमाळ या जागांसाठी महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याची माहिती समोर येत आहे.
Udhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad Pawar
Udhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. येत्या 27 आणि 28 तारखेला बैठका घेऊन जागा आणि उमेदवार निश्चित केला जाणार आहे. मात्र, असं असताना महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना एन्ट्री दिली आहे. पण, त्यांचं अजूनही येणं निश्चित झालं नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जागावाटप थांबलं असल्याचं समजत आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. येत्या 27 आणि 28 तारखेला याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना घेण्यासाठी नेते सकारात्मक आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे की, ते अजूनही मविआचा भाग झालेले नाहीत. त्यामुळेच मविआचं पुढचं पाऊल उचलण्यात अडथळे येत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसाठी पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी काही मागण्याही केल्या होत्या. मात्र, त्या मागण्या आम्ही मान्य केल्या असून, त्यांचं स्वागत करत असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रकाश आंबेडकरांना त्यांचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

Udhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad Pawar
J P Nadda Mumbai Visit : जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर; पाहा खास फोटो!

कोणत्याही क्षणी निवडणुका घ्या... आम्ही तयार आहोत

महाराष्ट्रात आता कधीही कोणतीही निवडणूक घ्या, आम्ही तयार आहोत, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी दाखवला आहे. जागावाटप आणि उमेदवार निश्चित झाले आहेत. येणाऱ्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार आहोत. कोणत्याही क्षणी निवडणुका लावा, त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असल्याचं वक्तव्य रमेश चेन्नीथला यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी एकजुटीने लढणार आहे आणि विशेष म्हणून काँग्रेस पक्षात एकजुटीने काम सुरू आहे. अशोक चव्हाण गेल्यानंतर कोणीही जाणार नाही. आता सगळे कामाला लागले आहेत. अंतर्गतदेखील आता सगळं सुरळीत आहे आणि निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. सगळ्या जागांवर महाविकास आघाडी निवडून येईल, असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मविआ'त या पाच जागांवरून मतभेद

महाविकास आघाडी पक्ष आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. या पाच जागांमुळे मविआत अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. रामटेक, वर्धा, उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर आणि यवतमाळ या जागांसाठी महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेच्या या पाच जागांवरून महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं घोडं अडून आहे. महाविकास आघाडीत वंचितदेखील सामील असून, त्यांच्या येण्याने मविआ पक्षातील जागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा तिढा निवडणुकीआधी सोडवण्याची गरज आहे. त्याशिवाय हा फॉर्म्युला ठरणं अशक्य आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Udhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad Pawar
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार; 'स्वाभिमानी'च्या नव्या घोषणेने राजकीय गणितं बिघडणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com