Mantralaya News : काय सांगता ! चक्क मंत्रालयातीलच इंटरनेट सहा तास बंद; पाससाठी गर्दी

Internet in Mantralaya : प्रशासकीय कामात मोठ्या अडचणी
Mantralaya
MantralayaSarkarnama

Mumbai Mantralaya News : सध्या डिजिटल इंडियाच्या पथावरुन देशाने प्रवास सुरू केलेला आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकांच्या आयुष्यात आता इंटनेटचे महत्व वाढत आहे. शाळा, महाविद्यालयांसह सरकारी कार्यालयात पेपरलेस कामकाज सुरू झाल्यानंतर इंटरनेटला अनन्यसाधारण महत्व आले आहे.

डिजिटल इंडियाचे (Digital India) स्वप्न उराशी बाळगले असले तरी ई-सेवा केंद्रातील कामकाज अनेकवेळा इंटरनेटअभावी खोळंबते. सरकारी कार्यालयातील सर्व्हर वारंवार डाऊन असतात. परिमाणी सामान्य नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येते. वारंवार तक्रारी करूनही यावर काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचेही समोर येते. दरम्यान, आज चक्क मंत्रालयातीलच इंटरनेट सेवा बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Mantralaya
Ashok Pawar News : दिग्गज अशोक पवारांना बांदल-मांढरे-पाचुंदकरांचा दे धक्का !

मंत्रालयालयातील (Mantralaya) इंटरनेटसेवा मंगळवारी (ता. १८) दुपारी अचानक बंद पडली. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेश पत्रिका विभाग व इतर काही विभागातील कामांवर परिणाम झाला. इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे नागरिकांची गेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन गैरसोय झाली. त्याचबरोबर मंत्रालयातील काही विभागातील प्रशासकीय कामकाजही ठप्प पडले होते. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र मंत्रालयात दिसून आली.

Mantralaya
Nana Patole : 'ऑपरेशन लोटस'चे वादळ घोंघावण्याची काँग्रेसला धास्ती; नाना पटोले ॲक्शन मोडवर

Mumbai मंत्रालयाच्या गेट नंबर दोन वरील प्रवेश पत्रिका विभागातील इंटरनेट दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अचानक बंद पडले. त्यामुळे मंत्रालयात कामासाठी आलेल्या हजारो नागरिकांना प्रवेश पास मिळण्यास अडचण झाली होती. परिणामी गेटवर नागरिकांची मोठी गर्दी झाली. इंटनेट नसल्याने ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे काही लेखी पास मिळण्यास सुरुवात केली.

Mantralaya
MPSC News : राज्य सरकारच्या पत्राला एमपीएससीकडून केराची टोपली; विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही निर्णयात बदल नाहीच !

गेटवर नागरिकांची गर्दी होती तर आतमधील काही विभागातील कामकाज ठप्प झाले होते. इंटरनेटअभावी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना फाईल अपलोड करणे, पाठवणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रशासकीय कामात मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. रात्री आठच्या सुमारास पुन्हा इंटरनेट सेवा सुरळीतपणे चालू झाली. दरम्यान, इंटरनेट सेवा बंद पडण्याचे कारण समजू शकले नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com