Mahadev Jankar News : 'रासप'च्या महादेव जानकरांनी लोकसभेचा मतदारसंघ ठरवला; 'या' ठिकाणाहून निवडणूक लढविणार !

Maharashtra Politics : '' राज्यात भाजप, कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या चार पक्षांपासून सावध राहा...''
Mahadeo Jankar
Mahadeo JankarSarkarnama

Pune : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यात 'इंडिया' आघाडीकडून एकीकडे बैठकांचा धडाका सुरु असून भाजपसमोर तगडं आव्हान उभं करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपप्रणित 'एनडीए'ला पहिला झटका बसताना राष्ट्रीय समाज पक्षाने बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचा पुणे येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात महादेव जानकर यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजप(BJP) आणि काँग्रेस यांची नियत एकसारखी आहे. राज्यात भाजप, कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या चार पक्षांपासून सावध रहा. तुमची मोठी पार्टी आहे मग इतर पक्ष का फोडता असा सवाल त्यांनी भाजपला केला. घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांना टोला लगावताना ते म्हणाले, जानकर हा शेवटचा राजकारणात असणार, माझा पुतण्या किंवा इतर कुणी राजकारणात नसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mahadeo Jankar
Madhya Pradesh BJP News: भाजपचे मिशन मध्य प्रदेश : 3 सप्टेंबरपासून 'जन आशीर्वाद यात्रा, अमित शाह दाखवणार हिरवा झेंडा

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर(Mahadeo Jankar)यांनी आगामी निवडणुकांमध्ये आपण कोणाबरोबरही जाणार नसून स्वबळावरच निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केल्याची घोषणा केली आहे. आता महादेव जानकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला मतदारसंघ ठरवला आहे.

Mahadeo Jankar
Manipur News : मणिपूर विधानसभेचे अधिवेशन अवघ्या ११ मिनिटांत अनिश्चित काळासाठी तहकूब

त्यांनी बारामती किंवा माढा यापैकी एका ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना छोटे पक्ष संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले.

जानकर म्हणाले, आम्ही सध्या स्वबळावर ५४३ जागा लोकसभा लढणार. मी महाराष्ट्र परभणी माढा आणि बारामती या मधील एका ठिकाणमधून लोकसभा लढणार असून महाराष्ट्रात भारतात सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही कोणासोबत जाणार नाही, एनडीए किंवा इंडिया सोबत नाही. तर ४८ महाराष्ट्रात जागा लढणार जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर नाराज न राहता आपली ताकद वाढवली पाहिजे. रासप (Rashtriy Samaj Paksha) पक्ष मोठा झाला पाहिजे असा कानमंत्रही जानकरांनी कार्यकर्त्यांना दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com