Thackeray Vs Shinde : ''...त्यांनी आता 'आनंदाश्रम'च हडपण्याचा डाव आखलाय !'' ; ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदेंवर गंभीर आरोप

Thane Political News : '' आनंदाश्रमच हडपण्याचा डाव...''
Thackeray Vs Shinde
Thackeray Vs ShindeSarkarnama

Thane : आनंद दिघे यांनी मोठ्या निष्ठेने टेंभी नाक्याचे नाव मोठे केले. कोणत्याही सण उत्सवात स्वत:चे बॅनर केव्हाही लावले नाही. परंतु, आता दिघे यांचे नाव वापरुन केवळ स्वत:चा स्वार्थ भागवण्याचे काम केले जात असल्याचा गंभीर आरोप उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला. त्यातच आता स्वत:सह ज्यांच्याबरोबर हातमिळविणी केली. त्यांचेही बॅनर लावण्याचे काम केले जात आहे. हे यांचे संस्कार आहेत का? असा सवालही दिघे यांनी उपस्थित केला. त्यामुळे शिंदे गट विरुध्द ठाकरे गट यांच्यातील वाद उफाळणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिंदे व ठाकरे असे दोन गट पडले आहेत. त्यात शिवसेनेतील बंडाळीनंतर ठाण्यात ठाकरे गट(Thackeray Group) आणि शिंदे गट यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच दहीकाल्याच्या आदल्यादिवशीच शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय काला रंगल्याचे चित्र दिसून आले.

Thackeray Vs Shinde
Eknath Shinde News : सरकारचा 'जीआर' आला तरी जरांगे पाटलांची माघार नाहीच ; अखेर मुख्यमंत्री शिंदेंनी दिली 'ही' ग्वाही

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजन विचारे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर शिंदे गटाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर ठाकरे गटाने हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवात राजकीय काला सुरु झाला आहे असे असताना आता आता केदार दिघे (Kedar Dighe) यांनी देखील आता शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

व्हिडिओमध्ये कुठेही विचारे यांनी दिघे किंवा टेंभीनाक्याचे नाव खराब केल्याचे दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाण्याला एक वेगळा इतिहास आणि संस्कृती आहे. परंतु केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी शिंदे गटा(Shinde Group) ने दुसऱ्यांबरोबर हातमिळवणी केल्याचा दावाही त्यांनी केला.

Thackeray Vs Shinde
Wadettiwar on Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी ‘ते’ पाऊल स्वतःहून उचलायला पाहिजे होतं !

आनंदाश्रम हे श्रध्दास्थान असतांना, यांचेच प्रवक्ते, नेते, पायात चपला घालून दिघे यांना वंदन करताना दिसतात. दिघे यांच्या पश्चात बाहेरुन जाताना प्रत्येकजण हा आनंद आश्रमाकडे पाहून नमस्कार करतो. आता आनंदाश्रमच हडपण्याचा डाव आखला गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच त्याठिकाणी स्वत:चे आणि पक्षाचे नाव लावण्याचा प्रकारही त्यांनी केला असल्याचा आरोप दिघे यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com