Salman Khan: सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्याने फेसबूक पोस्ट करत जबाबदारी स्वीकारली

Salman Khan News: अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक अकाऊंटद्वारे एका व्यक्तीने सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अकाऊंटद्वारे सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे.
Salman Khan
Salman KhanSarkarnama
Published on
Updated on

Salman Khan House Firing Latest Update: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील वांद्रे (Bandra) येथील घराबाहेर आज (14 एप्रिल) रोजी दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर बाईकवरुन आलेल्या दोघांनी सलमानच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता या हल्ल्याची जबाबदारी अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) नावाच्या व्यक्तीने स्वीकारली आहे.

अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक (Facebook) अकाऊंटद्वारे एका व्यक्तीने सलमानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अकाऊंटद्वारे सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे.

या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे, "सलमान हा तर फक्त एक ट्रेलर आहे. आम्ही हे काम केलं कारण तुला आमची आमची ताकद समजावी, आता आणखी परीक्षा घेऊ नकोस. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. शिवाय पुढच्यावेळी रिकाम्या घरावर गोळ्या चालणार नाहीत." अशी धमकी फेसबूक पोस्टद्वारे देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई पोलिस अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक खात्याची सत्यता पडताळत आहेत. परंतु, सलमानला याआधीही अशा धमक्या आल्या असून आता तर गुंडानी थेट सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याने पुन्हा एकदा सलमानच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Salman Khan
Salman Khan: गोळीबारानंतर मुख्यमंत्र्यांचा सलमान खानला फोन; सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज पहाटे झालेल्या गोळीबारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकारणही चांगलच तापलं होतं. विरोधकांनी ही घटना म्हणजे गृहमंत्र्याचं अपयश असल्याचं म्हटलं होतं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरुन चर्चा केली.

Salman Khan
Shrikant Shinde News : श्रीकांत शिंदेंची पावले रुग्णालयाकडे वळली, शिवसैनिकासाठी...

तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी (Mumbai Police Commissioner) चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना केल्या. या गोळीबारानंतर सलमान खानच्या घराबाहेर सध्या मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परंतु, अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक अकाऊंटवरील ही पोस्ट समोर आल्याने पुन्हा एकदा सलमानच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. तर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला मागील अनेक वर्षांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे ही बाब गंभीर मानली जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com