Shrikant Shinde News : श्रीकांत शिंदेंची पावले रुग्णालयाकडे वळली, शिवसैनिकासाठी...

Kalyan Loksabha : डोंबिवली शहर शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी गजानन व्यापारी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Shrikant Shinde meet ShivSainik
Shrikant Shinde meet ShivSainiksarkarnama

Dombivli Political News : शिवसैनिक हा शिवसेनेत सर्वात मोठा नेता आहे, असे बाळासाहेब ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणात म्हणत होते. शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिवसैनिक दुखावले गेले. मात्र, तरीही काहींनी उद्धव ठाकरेंना साथ दिली तर काहींनी एकनाथ शिंदेंना. शिवसैनिकांना प्राधान्य देण्याचे काम दोन्हीही गटाकडून करण्यात येत आहे. याचा प्रत्यय डोंबिवलीमध्ये आला.

Shrikant Shinde meet ShivSainik
Lok Sabha Election: ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदिवासी भागातील महिला नेत्याला मोठी संधी

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे उमेदवार आहेत. डोंबिवलीमध्ये ते प्रचारासाठी आले होते. डोंबिवलीतील जेष्ठ शिवसैनिक गजानन व्यापारी यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते रुग्णालयात होते. ही माहिती श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांना कळाली असता त्यांनी रुग्णालयात जात गजानन व्यापारी यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डोंबिवली शहर शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी गजानन व्यापारी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रविवारी खासदार श्रीकांत शिंदे हे डोंबिवली एमआयडीसीच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान वेळ काढत त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन व्यापारी यांची भेट घेतली. त्यांच्यावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेचे तसेच त्यांची आता तब्येत कशी आहे याची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'खासदार शिंदे कोणाला काही अडचण असल्यास त्यांच्या मदतीसाठी देखील लगेच धावतात. गजानन व्यापारी यांची भेट घेत त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. खासदार शिंदे यांच्या अशा नेतृत्वामुळेच प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांच्यासाठी झटत आहे', अशी भावना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केली.

(Edited By Roshan More)

Shrikant Shinde meet ShivSainik
Sunetra Pawar News: त्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी जोडले हात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com